घरताज्या घडामोडीLive Update: मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर संजय राठोड 'वर्षा'वरून निघाले

Live Update: मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर संजय राठोड ‘वर्षा’वरून निघाले

Subscribe

मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर संजय राठोड वर्षावरून निघाले आहेत. तर सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण वर्षावर दाखल झाले आहेत.


वनमंत्री संजय राठोड मंत्रिमंडळाची बैठक संपताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी वर्षा बंगल्यावर गेले आहेत. सध्या वर्षा बंगल्यावर राठोड मुख्यमंत्र्यांशी चर्चा करत आहेत.

- Advertisement -

‘सह्याद्री’वर राज्य मंत्रिमंडळाची बैठक संपली. दोन तास संजय राठोड राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत उपस्थित होते. पूजा चव्हाण प्रकरण, पोहरादेवीतील गर्दीवरुन घटकपक्ष नाराज


कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरच्या अंबाबाई मंदिर दर्शनवेळेत बदल करण्यात आले आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने निर्णय घेतला आहे. उद्यापासून अंबाबाई मंदिर २ टप्प्यात उघडणार आहे. सकाळी ७ ते दुपारी १२ पर्यंत मंदिर उघडलं जाणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यात दुपारी ३ ते रात्री ८ पर्यंत अंबाबाई मंदिर खुलं राहणार आहे. दुपारी १२ ते ३ या वेळेत मंदिर पूर्णपणे बंद राहणार आहे. मंदिरात भाविका मास्क बंधनकारक असणार आहे. सर्व भाविकांचं यावेळी थर्मल स्क्रीनिंगही केली जाणार आहे.

- Advertisement -

‘सह्याद्री’वर राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुरू असून या बैठकीत संजय राठोड येथील उपस्थित राहिले आहेत. शिवाय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे देखील या बैठकीत उपस्थित आहेत.


अंधेरीत एनसीबीची मोठी कारवाई, ड्रग्स तस्कर अकबर चौकटला अटक


प्रसिद्ध गायक सरदूल सिंकदरचे कोरोना संसर्गाने निधन


जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमला पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नाव


वनमंत्री संजय राठाेड मुंबई विमान तळावर दाखल, राज्यमंत्री मंडळ बैठकीला राहणार उपस्थित


शेअर मार्केटमध्ये तांत्रिक बिघाड, निफ्टी, बँक निफ्टीचे व्यवहार बंद


मुंबईतील ओव्हल मैदान पुढील 15 दिवस बंद राहणार, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई मनपाचा निर्णय


पामेला गोस्वामी ड्रग्ज प्रकरणात कोलकाता पोलिसांनी मोठी कारवाई करत भाजपा नेते राकेश सिंह यांना अटक केली आहे. राकेश सिंह यांच्यासह त्यांच्या दोन्ही मुलांनाही अटक करण्यात आली असून, पश्चिम बंगालमधील पूर्बा वर्धमान जिल्ह्यात ही कारवाई करण्यात आली.


महाराष्ट्रासह पाच राज्यातून येणाऱ्या नागरिकांना कोरोना चाचणी बंधनकारक, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली सरकारचा मोठा निर्णय


वनमंत्री संजय राठोड मुंबईकडे रवाना, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थिती पार पडणाऱ्या राज्य मंडळ बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता


पोलीस कार्यालयात 50 टक्के हजेरी, इतरांना वर्क फ्रॉम होम, पोलीस महासंचालकांचे आदेश


मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृहावर राज्य मंत्रिमंडळाची बैठक


मुंबईतील कोविड सेंटर पुन्हा सुरु होणार, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने निर्णय


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -