Monday, February 22, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी Live Update: मुंबईत २४ तासांत आढळले ७६० नवे रुग्ण, ४ जणांचा मृत्यू

Live Update: मुंबईत २४ तासांत आढळले ७६० नवे रुग्ण, ४ जणांचा मृत्यू

Related Story

- Advertisement -

मागील २४ तासांत मुंबईत ७६० नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ४ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या ३ लाख १९ हजार ८८८वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ११ हजार ४४६ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच आज दिवसभरात मुंबईत ६३४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, त्यामुळे मुंबईत कोरोनामुक्तीची संक्या ३ लाख १८०वर पोहोचली आहे.


- Advertisement -

मंत्रालयातील आठ कर्मचारी कोरोनाबाधित झाले आहेत. महसूव विभागातील आठ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. महसूल विभागात आज २२ जण गैरहजर होते. त्यातील आठ जण कोरोनाबाधित आढळले आहेत.


अर्थ नियोजन अधिवेशनात मांडू तसं पाण्याचं सुद्धा नियोजन करावे लागणार – उद्धव ठाकरे


- Advertisement -

नागपुरात लॉकडाऊन नाही, पण कठोर निर्बंध : ऊर्जामंत्री नितीन राऊत


कोल्हापूरातील बंद केलेले कोव्हिड सेंटर पुन्हा होणार सुरु


अहमदनगर औरंगाबाद महामार्गवर भीषण अपघात झाला आहे. नेवासा तालुक्यातील श्रीक्षेत्र देवगड फाटा येथे भीषण अपघात झाला आहे. स्विफ्ट आणि लक्झरी गाडीची धडक झाल्याने हा भीषण अपघात झाला. या अपघातात 5 जण जागीच ठार झाले असून साऱ्यांना जिल्हा प्राथमिक रुग्णालयात भर्ती करण्यात आले. पहाटे 2 च्या सुमारास ही घटना घडली.


नागपूरात विनामास्क फिरणाऱ्यांवर धडक कारवाईची मोहिम, एका दिवसात विनामास्क फिरणाऱ्या 151 जणांवर कारवाई, रविवारी 75500 रुपयांचा दंड केला वसूल, गेल्या काही महिन्यात शहरात 33 हजार पेक्षा जास्त जणांवर कारवाई, नागपूर मनपाने जवळपास दीड कोटींचा दंड केला वसूल


 

- Advertisement -