घरताज्या घडामोडीLive Update: केंद्र सरकार अदृश्य राजकारण का करत आहे?

Live Update: केंद्र सरकार अदृश्य राजकारण का करत आहे?

Subscribe

‘केंद्र सरकार करतय पडद्यामागून राजकारण’

‘केंद्र सरकार पडद्यामागून राजकारण करत आहे का?, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. त्याचप्रमाणे संजय राऊत यांनी केंद्र सरकारला ट्विटरच्या माध्यमातून प्रश्न उपस्थित करत केंद्र सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे.

‘केंद्राने टोकाची भूमिका घेऊ नये’

- Advertisement -

‘शेतकऱ्यांच्या मागण्या रास्त आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या ज्या अडचणी आहेत, त्या सोडवायला हव्यात. केंद्राने टोकाची भूमिका घेऊ नये’, असे मत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत मांडले आहे.


‘उगाच शिळ्या कढीला उत कशाला’?

- Advertisement -
महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी विरोधकांकडून नेहमीच वेगवेगळे दावे केले जात आहेत. त्यातच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अनेक नेते भेटत आहेत. त्यामुळे घरवापसी चर्चेला उधाण आले आहे. याबाबत त्यांना विचारणा केली असता, ते म्हणाले की, “जेव्हा कोणी येईल, घरवापसी होईल तेव्हा सांगेन, उगाच शिळ्या कढीला उत कशाला?”, अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली आहे.

केंद्र सरकारने आणलेल्या नव्या तीन कृषी कायद्याविरोधात आज दिल्लीत शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली. एकीकडे देशभरात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा होत असताना दिल्ली मात्र, तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, दिल्ली येथे शेतकरी आंदोलनाला लागलेल्या गालबोटावर, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी टीका केल्यानंतर आता त्यांच्या पाठोपाठ शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. ‘केंद्र सरकार पडद्यामागून राजकारण करत आहे का?, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. त्याचप्रमाणे संजय राऊत यांनी केंद्र सरकारला ट्विटरच्या माध्यमातून प्रश्न उपस्थित करत केंद्र सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे


भारतीय वायुसेनेकडून आकाशात भारताच्या शक्तीचं प्रदर्शन, भारतीय वायुसेनेकडून फ्लाय पासला सुरुवात,  रुद्र फॉर्मेशन, सुदर्शन फॉर्मेशन, रक्षक फॉर्मेशन, भीम फॉर्मेशन, नेत्र फॉर्मेशन, गरुड फॉर्मेशन,विजय फॉर्मेशनचं सादरीकरण, चिनूक हेलिकॉप्टर , मी-35, अपाचे हेलिकॉप्टर , सी-170, सुखोई 30 , सी-17, एमकेआई-एसयू विमान, राफेल लढाऊ विमानांचा सहभाग


संयम सोडू नका, असे आवाहन राजू शेट्टी यांनी केले आहे.


दिल्ली-हरियाणाच्या तिकरी बॉर्डरवर शेतकऱ्यांची पोलिसांनी सुरक्षेसाठी उभारलेले बॅरिकेड्स तोडले आहेत. हे शेतकरी पंजाबमधील किसान मजदूर संघर्ष समितीचे असल्याची माहिती मिळाली आहे. संयुक्त किसान मोर्चाने अद्याप मोर्चासाठी सुरुवात केलेली नाही. दरम्यान तिकरी बॉर्डरवर शेतकरी नेत्यांनी आंदोलकांना शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे.


शिवाजी पार्कवर पथसंचलानाला सुरुवात


Live: नवी मुंबई महापालिका मुख्यालयात प्रजासत्ताक दिनाला सुरुवात


दिल्लीत राजपथावर प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या पथसंचलनाप्रमाणे राजधानीच्या परिघावर शेतकऱ्यांचे ‘पथसंचलन’ होणार आहे. त्यांच्या ट्रॅक्टर मोर्चाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.


शिवेंद्रराजे भोसले घरवापसी होणार? 

राज्यात भाजपकडून वारंवार महाविकास आघाडीचं सरकार पाडण्याचे नवनवे मुहूर्त आणि दावे केले जात असताना भाजपला आता मोठा धक्का बसणार आहे. सातार्‍याचे भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले हे पुन्हा एकदा घरवापसी होणार आहे. विशेष म्हणजे त्यांच्यासोबत इतरही आमदार आहेत जे लवकरच राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करतील. पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत हा सोहळा काही दिवसातच आयोजित केला जाणार असल्याची अधिकृत माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली आहे.


भाजपचे निर्णायक नारायणास्त्र

भाजपच्या हातातोंडाशी आलेली महाराष्ट्रातील सत्ता गेल्यानंतर केंद्र आणि राज्यातील भाजपच्या नेत्यांचा प्रचंड अपेक्षाभंग झाला. २०१९ साली केंद्रात नरेंद्र मोदी हे पुन्हा पूर्वीपेक्षा मोठ्या बहुमताने पंतप्रधानपदी विराजमान झाले. त्यामुळे राज्यातील भाजपच्या नेत्यांच्या आकांक्षा अधिक मजबूत झाल्या होत्या. आता २०१९ सालची विधानसभा निवडणूक ही केवळ आता एक औपचारिकता उरलेली आहे. सत्ता आपलीच येणार आणि पुन्हा मुख्यमंत्री मीच होणार, असा विश्वास भाजप नेते देवेंद्र फडणवीस प्रचारसभांमधून व्यक्त करत होतो. पण आतील प्रवाह काही वेगळ्या प्रकारचे होते, याची फडणवीसांना कल्पना नव्हती. शिवसेना म्हणत होती की, २०१९ सालच्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेचाच मुख्यमंत्री होईल, असे आश्वासन आम्हाला भाजपने दिले होते. पण आता ते नाकारत आहेत. तसेच दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना आम्ही शिवसैनिकाला मुख्यमंत्री बनविण्याचे वचन दिलेले आहे, त्यामुळे त्याचे पालन करण्यासाठी शिवसेनेचा मुख्यमंत्री झालाच पाहिजे, असा निर्धार शिवसेनेने केला.

Pradnya Ghogalehttps://www.mymahanagar.com/author/pradnya/
पत्रकारितेत ५ वर्ष पूर्ण. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. सामाजिक, आरोग्यविषयक विषयांवर लिहिण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -