घरताज्या घडामोडीLive Update: स्विमिंग करणारा माणूस बुडू शकत नाही- मृत मनसुख हिरेनचे शेजारी 

Live Update: स्विमिंग करणारा माणूस बुडू शकत नाही- मृत मनसुख हिरेनचे शेजारी 

Subscribe

हिरेन परिवारात कसलीच अडचण नाही, स्विमिंग करणारा माणूस बुडू शकत नाही – मृत मनसुख हिरेनचे शेजारी


या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी मनसुख हिरेनच्या पत्नींची मागणी, कांदिवलीच्या तावडे नावाच्या व्यक्तीचा शेवटचा फोन आला होता. पोलिसांना भेटायला जातो सांगून घरी परतलेच नाहीत, – मनसुख हिरेन पत्नी

- Advertisement -

राज्याचे मदत व पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार यांना कोरोनाची लागण


स्फोटकांनी भरलेल्या गाडीचा तपास एटीएसकडे, तर मनसुख मृत्यूप्रकरणाचा तपासही एटीएसकडे देण्याचा निर्णय- गृहमंत्री अनिल देशमुख,

- Advertisement -

मनसुख या प्रकरणातील मुख्य साक्षीदार होते, सरकारने स्वत:हून या प्रकरणात सखोल चौकशीचे आदेश द्यावेत- मुनगंटीवार


ही जर आत्महत्या असेल तर मृत्यूवेळी मनसुख हिरेन यांचे हात बांधलेले होते, पोलीस आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विधानात विसंगती आहे. प्रकरण एएनआयकडे सोपवावे- विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस


मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह विधानभवनात पोहोचले. मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी आणि कार मालकाचा संशयास्पद मृत्यू याबाबत परमबीर सिंह गृहमंत्री अनिल देशमुख यांना माहिती देणार आहेत.


दिल्ली-पुणे विमानात कोरोनाचा रूग्ण आढळल्याने खळबळ. कोरोना रूग्ण असल्याचे समजताच विमान अर्ध्या वाटेतून दिल्लीला पुन्हा रवाना करण्यात आलं. विमानात बसल्यानंतर कोरोना बाधित असल्याची माहिती प्रवाशाला समजली मात्र तोपर्यंत विमानाने टेक ऑफ करत प्रवास सुरू केला होता. या प्रकारानंतर सॅनिटायझेशनची प्रकिया पूर्ण केल्यानंतर विमानाचं पुण्याच्या दिशेने उड्डाण करण्यात आलं.


माहिती व सूचना प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रूग्णालयात घेतला कोरोना लसीचा पहिला डोस


राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शुक्रवारी मुंबईतील सर J. J. Hospital येथे जाऊन कोविड-१९ विरोधी कोव्हॅक्सीन लसीचा पहिला डोस घेतला.


मुंबईतील प्रमुख स्थानकांवरील प्लॅटफॉर्म तिकीट दरात ५ पटींनी वाढ कऱण्यात आल्यानंतर आता भारतीय रेल्वेकडून देशातील सर्वच प्लॅटफॉर्म तिकीटांच्या दरात वाढ करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांना आता सर्व स्थानकांवर १० रुपयांना मिळणारे प्लॅटफॉर्म तिकीट ३ पट जास्त म्हणजेच ३० रुपये द्यावे लागणार आहेत. कोरोना काळात अनावश्यक प्रवासाला आळा घालण्यासाठी ही भाडेवाढ करण्यात आल्याचे स्पष्टीकरण रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आले आहे.

  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस, ठाणे, कल्याण, पनवेल आणि भिवंडी या स्थानकांवरील प्लॅटफॉर्म तिकीट आता १० रुपयांवरुन ५० रुपये करण्यात आली आहे.

अकोला शहरातील लकडगंज परिसरातील लाकडांच्या दुकानांसह घरांना आज पहाटे भीषण आग लागली आहे. सोबतच आगीत तीन सिलेंडरचे स्फोटही झालेत. पहाटे तिनच्या सुमारास ही आग लागलीये. या आगीत विदर्भ टिंबर, दुर्गेश मार्ट, डेहनकर टिम्बर मार्ट, नुर अहेमद टिंबर मार्ट ही लाकूड आणि बांबूंची दुकानं जळून खाक झालीत. अग्नीशमन दलाच्या दहावर बंबांनी सकाळी सहा वाजेपर्यंत आगीवर नियंत्रण मिळवलंय. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होतेये. या आगीत ५० लाखांवर नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.


मराठा आरक्षण प्रकरण ११ न्यायमूर्तींच्या खंडपीठापुढे द्यावे, अशी मागणी करणारा राज्य सरकारचा अर्ज दाखल करण्यात आला आहे. ८ मार्च रोजी ही सुनावणी होत आहे त्याआधी राज्य सरकारची कोर्टापुढे ही मागणी करण्यात आली आहे, मराठा आरक्षणाचा सुप्रीम कोर्टात प्रकरण ८ मार्चला प्रत्यक्ष सुनावणी ऐवजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारेच होणार असल्याचे सांगितले जात आहे. सध्या हे प्रकरण ५ न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर आहे.


साताऱ्यातल्या पाटणमध्ये अवैध स्फोटकांचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. पाटण तहसीलदार आणि पोलीस निरीक्षकांनी ही धडक कारावाई केली आहे. तर पाटणमधील अवैध खाण व्यवसायिक आणि व्यावसायिकांना चांगलाच दणका बसला आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईत १६५० किलो अवैध जिलेटीनसह इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. या कारवाईच्या भीतीने खाणमालक फरार झाला असून पोलीस मालकाचा शोध सुरु करण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांना मिळालेल्या माहितीच्या आधारावर कारवाई करण्यात आली आहे. (सविस्तर वाचा)


देशात कोरोनाचा कहर कायम आहे. आज देशात १६ हजार ८३८ नव्या कोरोनाचे रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. यासह ११३ जणांचा कोरोनाने बळी गेला आहे. दिलासादायक म्हणजे १३ हजारांहून अधिकांनी कोरोनावर मात केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -