घरदेश-विदेशछत्तीसगडमध्ये CRPF जवानाकडून सहकाऱ्यांवर अंदाधुंद गोळीबार, ४ जवान ठार, ३ जखमी

छत्तीसगडमध्ये CRPF जवानाकडून सहकाऱ्यांवर अंदाधुंद गोळीबार, ४ जवान ठार, ३ जखमी

Subscribe

छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी मोर आली आहे. जिल्ह्यातील मरईगुडा येथील लिंगानापल्ली कॅम्पमध्ये एका CRPF जवानाने आपल्याच सहकारी जवानांवर अंदाधुंद गोळीबार केला आहे. या गोळीबारात ४ जवानांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर ३ जवान गंभीर जखमी झाले आहेत. यातील एका जवानाची प्रकृती अधिक चिंताजनक आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, मराईगुडा येखील लिंगानापल्ली कॅम्पमधील सीआरपीएफच्या ५० व्या बटालियमधील जवानांमध्ये काही मुद्द्यांवरून वाद झाला होता. हा वाद इतका टोकाला गेला की एका जवानाने बंदूकीतून गोळ्या झाडायला सुरुवात केली.

- Advertisement -

या गोळीबारच्या घटनेत अनेक जवान जखमी झाले आहेत. या सर्वांना रायपूर रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून अद्याप कोणताही प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र आरोपी जवानाला ताब्यात घेण्यात आले आहे.

- Advertisement -

सुकमामधील नक्षलवाद्यांनी शाळकरी मुलीसह पाच गावकऱ्यांचे केले अपहरण

सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी एका गावातून पाच जणांचे अपहरण केले, त्यानंतर सुरक्षा दलांकडून येथे शोध मोहीम सुरू आहे. पोलीस अधिकाऱ्याने रविवारी सांगितले की, ही घटना कोन्टा पोलीस ठाण्यापासून १८ किमी अंतरावर असलेल्या घनदाट जंगलातील बातेर गावात घडली. हा परिसर राजधानी रायपूरपासून ४०० किमी अंतरावर आहे.

सुकमाचे पोलिस अधीक्षक सुनील शर्मा यांनी सांगितले की, प्राथमिक माहितीनुसार नक्षलवाद्यांचा एक गट शनिवारी संध्याकाळी गावात पोहोचला आणि त्यांनी सातवीच्या विद्यार्थ्यांसह पाच गावकऱ्यांना जबरदस्तीने आपल्यासोबत नेले. अपहरण झाल्याची माहिती मिळताच सुरक्षा दलांनी परिसरात शोधमोहीम सुरू केली आहे.

आदिवासी समाजाकडून नक्षलवाद्यांना गाव सोडून जाण्याचे आवाहन

अपहरण का करण्यात आले हे अद्याप स्पष्ट झाले नाही. माओवादी कधी-कधी गावकऱ्यांनाही काही काळ बैठकीसाठी सोबत घेऊन जातात. मात्र बस्तर भागातील आदिवासींची संघटना असलेल्या सर्व आदिवासी समाजाने नक्षलवाद्यांना गाव सोडून जाण्याचे आवाहन केले आहे.


भारतीय बोटीवर गोळीबार करुन पाकिस्तानने मोडले नियम, भारत नोंदवणार निषेध

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -