घरताज्या घडामोडीJawad Cyclone: भारतीय रेल्वने Jawad चक्रीवादळामुळे 'या' ट्रेन केल्या रद्द

Jawad Cyclone: भारतीय रेल्वने Jawad चक्रीवादळामुळे ‘या’ ट्रेन केल्या रद्द

Subscribe

दक्षिण अंदमानच्या समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. बंगालच्या उपसागरातही कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून त्याची तीव्रता वाढली आहे. २ डिसेंबरला त्याचे चक्रीवादळात रुपांतर झाले आहे. या चक्रीवादळाचे नाव सौदी अरेबियाने ‘जवाद’ असे दिले आहे. हे ‘जवाद’ चक्रीवादळ ४ डिसेंबर रोजी आंध्रप्रदेश आणि ओडिशाच्या किनारपट्टीला धडकण्याची शक्यता हवामान विभागाने दिली आहे. तसेच या चक्रीवादळा परिणाम महाराष्ट्रावर होणार आहे. त्यामुळे जवाद चक्रीवादळच्या पार्श्वभूमीवर भारतीय रेल्वे सतर्क झाली आहे. भारतीय रेल्वेने आज आणि उद्याच्या (३ डिसेंबर आणि ४ डिसेंबर) ७ ट्रेन रद्द केल्या आहेत. या ट्रेन ओडिसा आणि दक्षिण भारतातील राज्यात जाणाऱ्या होता.

भारतीय रेल्वेने धनबाद-एलेप्पी एक्स्प्रेस, पटना एर्नाकुलम एक्सप्रेस, पुरुषोत्तम एक्स्प्रेस, नीलांचल एक्स्प्रेस आणि भुवनेश्वर-नवी दिल्ली राजधानी एक्स्प्रेस रद्द केल्यात आहेत. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून रेल्वेने हे पाऊल उचलले आहे. परंतु ट्रेन रद्द झाल्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. यापूर्वी रेल्वेने मे महिन्याच्या सुरुवातीला चक्रीवादळामुळे ट्रेन रद्द केल्या होत्या.

- Advertisement -

कोणत्या ट्रन रद्द केल्या?

  • ट्रेन क्रमांक १२८०२ नवी दिल्लीहून पुरीला जाणारी पुरुषोत्तम एक्स्प्रेस आज रद्द
  • पटणाहून निघणारी पटणा-एर्नाकुलम एक्स्प्रेस ट्रेन आज रद्द
  • धनबादहून सुटणारी धनबाद-एलेप्पी एक्स्प्रेस आज रद्द
  • आनंद विहार येथून निघणारी आनंद विहार-पुरी निलांचल एक्स्प्रेस आज रद्द
  • तसेच पुरीहून निघारी पुरी-नवी दिल्ली पुरुषोत्तम एक्स्प्रेस आज रद्द
  • पुरीहून उद्या सुटणारी पुरी-आनंद विहार नंदनकानन एक्स्प्रेस रद्द
  • भुवनेश्वरहून निघणार भुवनेश्वर-नवी दिल्ली राजधानी एक्स्प्रेस रद्द

हेही वाचा – Indian Railway: शेतकरी आणि इतर आंदोलनामुळे रेल्वेचं ३६.८७ कोटींचं नुकसान; सरकारने दिली माहिती


Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -