Eco friendly bappa Competition
घर ताज्या घडामोडी Cyclone Mocha: येत्या 48 तासांत बंगालच्या उपसागरात 'मोचा' चक्रीवादळाची होणार निर्मिती

Cyclone Mocha: येत्या 48 तासांत बंगालच्या उपसागरात ‘मोचा’ चक्रीवादळाची होणार निर्मिती

Subscribe

मागील अनेक वर्षांपासून बंगालच्या उपसागरात अनेक चक्रीवादळं निर्माण होत आहेत. अशातच आणखी एका चक्रीवादळाची निर्मिती होणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यानुसार, येत्या 48 तासांत या भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊ शकतो.

मागील अनेक वर्षांपासून बंगालच्या उपसागरात अनेक चक्रीवादळं निर्माण होत आहेत. अशातच आणखी एका चक्रीवादळाची निर्मिती होणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यानुसार, येत्या 48 तासांत या भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे बंगाल आणि ओडिशाच्या किनारपट्टीवर ‘मोचा’ चक्रीवादळाची (Cyclone Mocha) निर्मिती होणार आहे. या वादळाच्या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने पाच दिवस सतर्कतेचा इशारा दिला आहे. (cyclone mocha get to know about this trophical cyclone forecast bengal odisha imd)

बंगालच्या उपसागरात ‘मोचा’ चक्रीवादळाची निर्मिती होणार असल्याने पुढील दोन दिवस वायव्य भारतात जोरदार वाऱ्यासह हलका ते मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. याशिवाय, उत्तर प्रदेशात मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वादळ आणि पाऊस पडण्याची शक्यता असून अनेक ठिकाणी गारपीटही होऊ शकते. पंजाब, उप-हिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, आसाम आणि मेघालय, किनारी आंध्र प्रदेश आणि यानम, तेलंगणा, रायलसीमा, दक्षिण अंतर्गत कर्नाटक, तामिळनाडू, पुडुचेरी, कराईकल, केरळ आणि माहे येथे काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज IMD ने वर्तवला आहे.

- Advertisement -

अमेरिकेचे हवामान अंदाज मॉडेल ‘ग्लोबल फोरकास्ट सिस्टम (GFS)’ आणि युरोपियन सेंटर फॉर मीडियम रेंज वेदर फोरकास्ट (ECMWF) यांनीही बंगालच्या उपसागरावर चक्रीवादळ येण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

चक्रीवादळांना नावं कशी दिली जातात?

  • चक्रीवादळाच्या नावांसाठी दक्षिण आशियायी राष्ट्रांचा एक गट तयार करण्यात आला आहे.
  • इथं देशांकडून वादळांच्या नावांचे पर्याय मागवण्यात येतात.
  • या नावांची एक यादी तयार केली जाते.
  • सध्याच्या घडीला तयार असणारी नावांची यादी ही इतकी मोठी आहे की, चक्रीवादळं कमी आल्यास 3 वर्षे ही नावं पुरेशी असतील.
  • चक्रिवादळांची नावं निर्धारित करण्यासाठी काही मार्गदर्शक तत्व पाळली जाणं महत्त्वाचं असतं.
  • यामध्ये कोणत्याही संवेदनशील नावांची निवड केली जात नाही.
  • लिंगभेदी आणि धार्मिक तेढ निर्माण करणारी नावंही टाळली जातात.
  • राजकीय नेते, ऐतिहासिक व्यक्ती यांची नावंही वादळांना देण्यात येत नाहीत.

- Advertisement -

हेही वाचा – पत्नीचा होतोय दुसरा विवाह; पतीची हायकोर्टात धाव, पोलीस करणार चौकशी

- Advertisment -