घरदेश-विदेश'डी. जी. वंजारांनी दिली होती हरेन पांड्यांची सुपारी'

‘डी. जी. वंजारांनी दिली होती हरेन पांड्यांची सुपारी’

Subscribe

गुजरातचे माजी गृहमंत्री हरेन पांड्या यांच्या खुनाची सुपारी डी. जी. वंजारा यांनी दिल्याचा दावा गँगस्टर आझम खाननं केला आहे.

हरेन पांडया मृत्यू प्रकरणामध्ये आता गँगस्टर आझम खाननं धक्कादायक खुलासा केला आहे. डी. जी. वंझारा यांनी हरेन पांड्या यांच्या खुनाची सुपारी दिल्याचा दावा आझम खाननं केला आहे. सोहराबुद्दीन शेखनं ही माहिती दिली असा दावा यावेळी आझम खाननं केला आहे. गुजरातचे माजी गृहमंत्री हरेन पांड्या यांच्या खूनाची सुपारी सोहराबुद्दीनसह आणखी दोघांना देण्यात आली होती. उदयपुरच्या सेंट्रल जेलमधून सीबीआय कोर्टात सादर केलं असताना आझम खाननं हा नवा दावा केला आहे. दरम्यान, डी. जी. वंझारा यांना सध्या क्लिन चीट देण्यात आली आहे. यावेळी  मी सोहराबुद्दीनला हरेन पांड्या चांगली व्यक्ती असल्याचं देखील सांगितलं असं देखील आझम खाननं म्हटलं आहे. दरम्यान, ही सारी माहिती आपण सीबीआयला दिल्याचं देखील आझम खाननं म्हटलं आहे. ज्यावेळी मी याबाबत अधिकाऱ्यांना विचारलं तेव्हा त्यांनी ‘बखेडा हो जाऐगा’ असं उत्तर दिल्याचं आझम खाननं म्हटलं आहे. पण, कोर्टानं मात्र आझम खानचं हे विधान रेकॉर्डवर घेतलं नाही. २६ मार्च २००६ रोजी हरेन पांड्यांचा गोळी झाडून खून करण्यात आला होता. २०११ साली गुजरात उच्च न्यायालयानं याप्रकरणातील १२ जणांची निर्दोष सुटका केली होती. बारा जणांच्या याचिकेला आता सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान देण्यात आलं आहे. मात्र त्यावर अद्याप कोणतीही सुनावणी झालेली नाही.

दरम्यान २००२ साली माझी आणि सोहराबुद्दीनची भेट झाली अशी माहिती आझम खाननं सीबीआयच्या न्यायालयामध्ये दिली. त्यावेळी सोहराबुद्दीननं झुबेर या कॉन्ट्रॅक्ट किलरशी ओळख करून दिल्याचा दावा खाननं केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -