घरदेश-विदेशडान्सिंग अंकल ज्याच्या लग्नात नाचले, त्याच्यावर गोळीबार

डान्सिंग अंकल ज्याच्या लग्नात नाचले, त्याच्यावर गोळीबार

Subscribe

'आपके आ जानेसे' या गाण्यावर थिरकलेले डान्सिंग अंकल एव्हाना देशात सर्वांनाच माहीत आहेत. डान्सिंग अंकलच्या मेहुण्यावर दिवसाढवळ्या गोळीबार करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या मेहुण्याच्या लग्नातच अंकल आपके आ जानेसे गाण्यावर थिरकले होते.

डान्सिंग अंकल (संदीप श्रीवास्तव) हे नाव एव्हाना सर्वांनाच परिचित आहे. फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअॅप आणि युटयुबवर धुमाकुळ घालणारा डान्सिंग अंकलचा लग्नात नाचतानाचा व्हिडिओ सर्वांनीच पाहिला आहे. डान्सिंग अंकल एका लग्नात गोविंदाच्या ‘आपके आ जाने से’ या गाण्यावर थिरकले होते. लग्नाला आलेल्या वऱ्हाडापैकी एकाने यावेळी त्यांचा व्हिडिओ शुट केला होता. हा व्हिडिओ पाहता पाहता देशभर पोहोचला. आणि अंकल एका रात्रीत स्टार झाले. ज्या लग्नात श्रीवास्तव नाचले होते ते लग्न त्यांच्या मेहुण्याचे होते. श्रीवास्तव यांच्या त्या मेहुण्यावर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेचा श्रीवास्तव कुटुंबियांना धक्का बसला असून श्रीवास्तव मेहुण्याला भेटण्यासाठी त्याच्या घरी निघाले आहेत.

भर दिवसा केला गोळीबार

डब्बूजी उर्फ डान्सिंग अंकल म्हणून प्रसिद्ध झालेल्या श्रीवास्तव यांचा मेहुणा कुशाग्र याचे नुकतेच लग्न पार पडले. या कुशाग्रवर एका अज्ञाताने गोळीबार केला आहे. ग्वाल्हेर येथील जनकगंज पोलीस ठाण्याच्या परिसरात ही घटना घडली. कुशाग्रची तब्येत सथ्या गंभीर आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कुशाग्रच्या पायाला गोळी लागल्याची माहिती पोलिसांनी दिली. धक्कादायक बाब म्हणजे दुपारच्या वेळी गोळीबाराची घटना घडली आहे. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. डब्बूजी विदिशा येथे राहतात. डब्बूजी आणि त्यांचे कुटुंबिय कुशाग्रला भेटण्यासाठी विदिशाहून ग्वाल्हेरसाठी निघाले असल्याची माहिती मिळाली आहे.

- Advertisement -

असा झाला हल्ला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कुशाग्र त्याच्या मित्रासोबत घराबाहेर उभा होता. त्यावेळी चेहरा झाकलेला एक इसम कुशाग्रच्या घराची टेहळणी करत असल्याचे कुशाग्र व त्याच्या मित्राने पाहिले. यावर कुशाग्र त्या इसमावर ओरडला. त्याचवेळी त्या इसमाने त्याच्याकडच्या बॅगेत ठेवलेली बंदूक काढली आणि कुशाग्रवर गोळी झाडली. गोळी कुशाग्रच्या उजव्या पायाला लागली. कुशाग्रचा मित्र गोळी झाडणाऱ्याच्या मागे धावला त्याला पकडले. हल्लेखोराला पोलिसांच्या ताब्यात दिले. अमित उपाध्याय असे आरोपीचे नाव आहे. अमितने सांगितले की, तो कुशाग्रच्या वडिलांना मारायला तेथे गेला होता. परंतु त्याआधीच कुशाग्रने त्याला पाहिले, त्यामुळे कुशाग्रवर गोळी झाडावी लागली. पोलिसांनी घटनास्थळाजवळील सीसीटीव्ही फुटेज मिळवले आहे. ते यासंदर्भात अधिक तपास करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -