घरCORONA UPDATECoronavirus: चिंताजनक; देशातील कोरोना बळींची संख्या १ लाख पार!

Coronavirus: चिंताजनक; देशातील कोरोना बळींची संख्या १ लाख पार!

Subscribe

देशात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव सातत्याने वाढत आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. चितेंची बाब म्हणजे भारतात आतापर्यंत १ लाखांहून अधिका कोरोनाचे बळी गेले आहेत. कोविड-१९ इंडिया ट्रॅकरनुसार, देशातील कोरोनाबाधितांची संख्या ६४ लाख ४९ हजार २५९वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत १ लाख ३५२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ५४ लाख २ हजार ८०७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. तसेच सध्या ९ लाख ४५ हजार १७९ Active रुग्ण आहेत.

- Advertisement -

देशात सर्वाधिक कोरोना व्हायरसचा फटका महाराष्ट्र राज्याला बसला आहे. महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा १४ लाखांहून अधिक आहे. महाराष्ट्र पाठोपाठ आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, दिल्ली या राज्यात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहे. देशात १ लाखांहून अधिक रुग्ण १८ राज्यात आढळले आहेत.

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, आज देशात ८१ हजार ४८४ नव्या कोरोनाबाधित रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. तसेच १ हजार ९५ जणांचा मृत्यू झाला आहे. जगातील कोरोना यादीत बाधितांच्या संख्येत भारत दुसऱ्या क्रमांकावर असून बळींच्या संख्येत तिसऱ्या क्रमाकांवर आहे. तसेच दिलादायक बाब म्हणजे रुग्ण बरे होण्याच्या संख्येत भारत अव्वल स्थानावर आहे.

- Advertisement -

हेही वाचा – रस्ते अपघातात मृत्यू झाल्यास रस्ता बनवणाऱ्या कंपनीला होणार १ लाखांचा दंड


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -