घरदेश-विदेशतमिळनाडू: बोअरवेलमध्ये पडलेल्या चिमुकल्याला वाचवण्यात अपयश

तमिळनाडू: बोअरवेलमध्ये पडलेल्या चिमुकल्याला वाचवण्यात अपयश

Subscribe

घराजवळ खेळताना बोरवेलमध्ये पडलेल्या २ वर्षीय सुजीथ विलसनला वाचवण्याचे प्रयत्न ४ दिवसांपासून चालू होते मात्र २९ ऑक्टोबर, मंगळवारी पाहाटे त्याचा विघटित शव बाहेर काढण्यात आला.

जेव्हा सगळीकडे दिवाळीच्या पहिल्या दिवशी आया आपल्या मुलांना अभ्यंगस्नान घालत होत्या, तेव्हा तमिळनाडूमधील एक आई आपला बोरवेलमध्ये अडकलेला मुलगा सुखरूप राहण्यासाठी प्राथर्ना करत होती. सुजीत विलसन हा २ वर्षाचा चिमुरडा आपल्या घराजवळ खेळताना २५ ऑक्टोबर रोजी बोरवेलध्ये पडला.नादुकट्टुपट्टी येथे राहण्याऱ्या सुजीतला वाचवण्यासाठी केंद्र आणि राज्य संस्थाांना बोलावलं गेलं होतं. त्याचं बचावकार्य सलग ४ दिवस सुरू होतं. बचावकार्य सुरू असल्याच्या चौथ्या दिवशी, मंगळवारी पहाटे सुजीथचं विघटित शरीर मिळालं व त्याला मृत घोषित करण्यात आलं. महसूल प्रशासनाचे आयुक्त जे राधाकृष्णन म्हणाले की, मुलाचा मृतदेह अत्यंत विघटित अवस्थेत होता.

‘आम्ही त्याला वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला पण दुर्दैवाने ज्या बोअरवेलमध्ये तो पडला होता त्यामधून दुर्गंधीचा वास येऊ लागला’जे राधाकृष्णन

- Advertisement -

कसं होतं त्याचं बचावकार्य?

सुजीथला वाचवण्याचे बचावकार्य अत्यंत कठीण होत चालले होते कारण सुरुवातीला तो २५ फूट खोलीवर अडकला असून तो ८५ फूट अंतरावर घसरला. त्याच्या बचावकार्यासाठी एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि खाजगी तज्ञ असं डझन बचाव पथके त्या स्थानी उपस्थीत होते. २७ ऑक्टोबरला सुजीथ बेशुध्द झाला तरी श्वास घेत असल्याचं कळण्यात आलं. सुजीथला वाचवण्यासाठी ६५ फूटांपर्यंतचा समांतर खड्डा खोदला गेला होता, परंतु सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास मूळ बोअरवेलमधून वास येऊ लागला, असं तेथील अधिकारी म्हणाले.

- Advertisement -

एका वैद्यकीय पथकाला आत पाठविण्यात आले आणि त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले की शरीर विखुरलेले आणि कुजलेले आहे. त्यानंतर बोअरवेलमधून सुजितचा मृतदेह खोदण्याचा आणि बाहेर काढण्याचा निर्णय घेतला गेला.सुजीत बोअरवेलमध्ये अडकण्याच्या काही तासांनंतर सुजीतची आई काला मेरी सुजीतशी बोलत होती.
‘रडू नका, थोडा वेळ रडू नका. मी तुला बाहेर काढीन, अम्मा तुला बाहेर घेऊन जाईल. मी येथे वरतीच उभी आहे’ असं त्या म्हणाल्या.

तर भविष्यात असं आणखीन अपघात होऊ नयेत यासाठी तामिळनाडूतील या बोरवेलला सिमेंट टाकून बंद करण्यात आलं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -