घरदिवाळी २०२१ayodhya deepotsav 2021 : १२ लाख दिव्यांनी उजळून निघणार 'अयोध्यानगरी', गिनीज बुकमध्ये...

ayodhya deepotsav 2021 : १२ लाख दिव्यांनी उजळून निघणार ‘अयोध्यानगरी’, गिनीज बुकमध्ये होणार नोंद

Subscribe

दिवाळीनिमित्त यंदाही अयोध्या नगरी १२ लाख दिव्यांनी उजळून निघणार आहे. अयोध्यामध्ये यंदा ५ व्या दीपोत्सव प्रसंगी आणखी एक रेकॉर्ड ब्रेक केला जाणार आहे. आज सायंकाळी अयोध्यातील ३२ घाटांवर या दिव्यांची भव्य रोषणाई पाहायला मिळणार आहे. उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सरकार स्थापन केल्यानंतर २०१७ पासून अयोध्येत दरवर्षी दिवाळीनिमित्त दीपोत्सव कार्यक्रम साजरा केला जातो. यंदाचे हे पाचवे वर्ष आहे. यावर्षी १२ लाख दिवे प्रज्वलित केले जातील, तर गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डची टीम त्यांची मोजणी करणार आहे.

यासाठी १२ हजार स्वयंसेवक देखील तैनात करण्यात आले आहे. या दिव्यांनी रामायण काळ सजवला जाणार आहे. गेल्या पाच वर्षीच्या तुलनेत यंदा दिव्यांची संख्या खूप जास्त आहे. एकट्या रामाच्या चरणी सुमारे ९ लाख दिवे प्रज्वलित केले जातील. तर रामजन्मभूमी संकुलात सुमारे ५१ हजार दिवे प्रज्वलित केले जातील. अयोध्येतील प्राचीन मंदिरे आणि विविध ठिकाणी ३ लाखांहून अधिक दिवे प्रज्वलित केले जातील. याशिवाय अयोध्येतील १४ कोसी परिक्रमेतील जवळपास सर्व पौराणिक ठिकाणे, तलाव, मंदिरे येथेही दिव्यांची रोषणाई केली जाईल, इतकेच नाही तर अयोध्येशिवाय महाराज दशरथांनी पुत्रश्रेष्ठ यज्ञ केलेल्या बस्ती जिल्ह्यातील मोखाडा धामसह ८४ कोसी परिक्रमेतील अनेक ठिकाणी दिवे लावले जातील.

- Advertisement -

यासाठी ३२ तास २०० समन्वयक, ३२ पर्यवेक्षक आणि ३२ प्रभारींची नियुक्ती करण्यात आली होती. यामध्ये विद्यापीठाचे विद्यार्थींनी, विविध संस्थेतील स्वयंसेवक मोठ्या प्रमाणात हजेरी लावली. यासाठी तब्बल ३६,००० लिटर तेल वापरले जाणार आहे.

अशाप्रकारे होणार दिव्यांची मोजणी

वर्ल्ड रिकॉर्ड बुकच्या टाईम कंसल्टंट निश्चल भनोट यांच्या माहितीनुसार, अयोध्या नगरीतील या दिव्यांची रिकार्डमध्ये नोंद करण्यासाठी प्रत्येक दिव्याला किमान पाच मिनिटे जळणे आवश्यक आहे. आम्ही एका ड्रोनच्या साहाय्याने त्याची मोजणी करणार आहोत.

- Advertisement -

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -