घरताज्या घडामोडीCoronavirus : संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना कोरोनाची लागण

Coronavirus : संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना कोरोनाची लागण

Subscribe

देशात कोरोनाच्या संसर्गामुळे परिस्थिती प्रचंड बिघडत चालली आहे. रोज नवे रुग्ण मिळत असल्याने आरोग्य विभागही आता सतर्क झाला आहे. सर्वसामन्यांसह कोरोनाने राजकीय नेत्यांनाही विळखा घातला आहे. नुकताच केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे.

देशात कोरोनाच्या संसर्गामुळे परिस्थिती प्रचंड बिघडत चालली आहे. रोज नवे रुग्ण मिळत असल्याने आरोग्य विभागही आता सतर्क झाला आहे. सर्वसामन्यांसह कोरोनाने राजकीय नेत्यांनाही विळखा घातला आहे. नुकताच केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे. कोरोनाची बाधा झाल्याने राजनाथ सिंह यांनी स्वत:ला होम क्वारंटाईन करण्याचा निर्णय घेतला आहे. (Defense Minister Rajnath Singh COVID19 Positive Under Home Quarantine News And Updates)

डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर पुढील काही दिवस राजनाथ सिंह यांना विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. डॉक्टरांच्या माहितीनुसार, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यामध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे आढळून आली आहेत. विशेष म्हणजे, आज राजनाथ सिंह हे भारतीय वायुसेनेच्या कमांडर कॉन्फरन्समध्ये सहभागी होणार होते. पण संसर्ग झाल्याचे समजल्याने त्यांना त्यांचा कार्यक्रम रद्द करावा लागला.

- Advertisement -

राजधानी दिल्ली आणि महाराष्ट्रातही कोरोनाचा संसर्ग प्रचंड झपाट्याने पसरत आहे. बुधवारी महाराष्ट्रात कोरोना संसर्गाचे 1 हजार 100 नवीन रुग्ण आढळले. तर यामध्ये 4 जणांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीत आज कोरोनाचे नवी रुग्ण मिळाले असून त्यांची संख्या 1 हजार 767 वर पोहोचली आहे. त्याचबरोबर मृतांचा आकडाही 6 वर पोहोचला आहे.

देशाच्या राजधानीत आर्थिक राजधानी मुंबईतही कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे दररोज 250 हून अधिक नवीन प्रकरणे समोर येत आहेत. तर बुधवारी या प्रकरणात काहीसा दिलासाही मिळाला आहे. बुधवारी मुंबईत 234 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर यापैकी 15 जणांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

- Advertisement -

यामधील 5 रुग्णांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आले होते. तर 1 रुग्णाचा मृत्यू झाला. मुंबईतही कोरोनाचे रुग्ण वाढले असून मुंबईतही 319 रुग्ण बरे झाले असून त्यांना आता घरी सोडून देण्यात आले आहे.


हेही वाचा – उपमुख्यमंत्री पहिले, मुख्यमंत्री दुसरे तर अजित पवार तिसरे…; यात मारली बाजी!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -