घरदेश-विदेशभारत-चीन तणाव; सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह लष्करप्रमुखांसह करणार लडाखचा दौरा

भारत-चीन तणाव; सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह लष्करप्रमुखांसह करणार लडाखचा दौरा

Subscribe

चीनला जशास तसे उत्तर देण्यासाठी भारताकडून LAC वर सैन्यदलाने तयारी सुरु केली आहे, याचा आढावा घेण्यासाठी सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह शुक्रवारी दौरा करणार आहेत.

भारत आणि चीनमध्ये गेल्या काही दिवसांपासून प्रत्यक्ष ताबा रेषेवर (LAC) तणाव सुरु आहे. चीन एकाबाजूला भारताशी चर्चा करत असताना दुसऱ्या बाजूला प्रत्यक्ष ताबा रेषेवर सैन्य वाढवत आहे. या पार्श्वभूमीवर सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह हे लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे यांच्यासह लडाखचा दौरा करणार आहेत. यावेळी ते लष्कर आणि सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेणार आहेत. तसेच पूर्व लडाख येथील प्रत्यक्ष ताबा रेषेसोबत लेहला देखील ते भेट देणार आहेत. चीनला जशास तसे उत्तर देण्यासाठी भारताकडूनही तयारी केली जात आहे. भारताने देखील निगरानी पथक आणि सैनिकांची संख्या वाढवली आहे.

भारत आणि चीन दरम्यान चुशूल येथे लष्कराच्या कमांडर स्तरावर चर्चा नुकतीच संपन्न झाली. तब्बल १२ तास चाललेल्या या या चर्चेत चीनला सैन्य मागे घेण्यासंदर्भात सांगण्यात आले होते. तसेच २२ जून रोजी झालेल्या कराराचे पालन करावे, अशीही आठवण करुन देण्यात आली. मात्र या व्यतिरीक्त बैठकीतील अधिकची माहिती अद्याप बाहेर आलेली नाही.

- Advertisement -

मंगळवारी झालेल्या या चर्चेनंतर देखील चीन प्रत्यक्ष ताबा रेषेवर सैन्य वाढवत चालला आहे. मिळालेल्या माहितीनुसार चीनने पुर्व लडाखच्या नजीक २० हजार सैनिक तर शिनजियांग परिसरात १० हजार सैनिक तैनात केले आहेत. १५ जून रोजी गलवान खोऱ्यात भारत आणि चीनी सैनिकांमध्ये झटापट झाली होती. ज्यामध्ये भारताचे २० जवान शहीद झाले होते, ज्यात एका वरिष्ठ अधिकाऱ्याचा समावेश होता. त्यानंतर लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी देखील लेह-लडाखचा दौरा केला होता. त्यावेळी त्यांनी गलवान येथे हिंसाचारात जखमी झालेल्या बिहार रेजिमेंटच्या जवानांची विचारपूस केली होती.

भारताकडून ५९ चीनी Apps वर बंदी

भारत-चीनमध्ये प्रत्यक्ष ताबा रेषेवर तणाव सुरु झाल्यानंतर भारताकडून चीनची चहुबाजूंनी कोंडी करण्याचा प्रयत्न सुरु आहे. याचाच एक भाग म्हणून चीनच्या ५९ मोबाईल Apps वर बंदी घालण्यात आली. ज्यामध्ये लोकप्रिय अशा टिक टॉक App चा देखील समावेश होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -