घरट्रेंडिंगVideo: लग्नाआधी बजावला मतदानाचा हक्क!

Video: लग्नाआधी बजावला मतदानाचा हक्क!

Subscribe

दिल्लीतील विधानसभा निवडणुकीसाठी सकाळी आठ वाजल्यापासून मतदान करण्यास सुरुवात झाली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह सेलिब्रिटींनी मतदानाचा हक्क बजावला आहे. दुपारी ३ वाजेपर्यंत ३० टक्के मतदान झाले असल्याचं समोर आलं आहे. यावेळी दिल्लीतील मतदारांचा उत्साह कमी दिसत आहे. लक्ष्मी नगर विधानसभा मतदार संघात एक वेगळाच उत्साह पाहायला मिळाला. लग्नाआधीच इथल्या वराने पहिला मतदानाचा हक्क बजावला. धनंजय ध्यानी असं या वराचं नावं असून तो वरातीबरोबर मतदान केंद्रावर आला आणि त्याने लोकशाहीच्या उत्सवात हजेरी लावत आपली जबाबदारी पार पाडली.

- Advertisement -

यावेळी वराचे सर्व नातेवाईक लक्ष्मी नगरच्या केंद्रावर ढोल-ताशांच्या गजरात नाचत नाचत आले होते. यांनी देखील धनंजयच्या लग्ना आधी मतदान केलं. तसंच या वराने आपल्या होणाऱ्या बायकोला फोन करू मतदान करण्यास सांगितलं. डिसेंबरमध्ये धनंजयचा विवाह निश्चित झाला होता त्यावेळेस त्याला माहित देखील नव्हतं की मतदानाच्या दिवशी त्यांचे लग्न असेल.

- Advertisement -

त्याने इतर दिल्लीतील नागरिकांना मत करण्याचे आवाहन केले आणि म्हणाला की, ‘पाच वर्षात एकदा मतदान करण्याची संधी मिळते. त्यामुळे तुम्ही मतदान करा. मला नव्हतं माहिती माझं ८ फेब्रुवारीला लग्न असेल. मी मतदानासाठी थांबलो होतो. मी लग्नापेक्षा अधिक महत्त्व निवडणुकीला देतो.’


हेही वाचा – video : काँग्रेस उमेदवार अलका लांबा यांनी आप कार्यकर्त्यांवर उगारला हात


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -