Tuesday, June 22, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ताज्या घडामोडी केवळ प्रसिद्धीसाठी याचिका; जुहीला दिल्ली उच्च न्यायालाकडून २० लाखांचा दंड

केवळ प्रसिद्धीसाठी याचिका; जुहीला दिल्ली उच्च न्यायालाकडून २० लाखांचा दंड

जुहीने सुनावणीची लिंक सोशल मीडियावर शेअर केल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आले.

Related Story

- Advertisement -

अभिनेत्री जुही चावलाने 5G नेटवर्क विरोधात केलेली याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. केवळ प्रसिद्धीसाठी याचिका केल्याचे म्हणत दिल्ली उच्च न्यायालायने जुहीला फटकारले आहे. जुहीने सुनावणीची लिंक सोशल मीडियावर शेअर केल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आले. तसेच कायद्याचा गैरवापर केल्यामुळे तिला २० लाख रूपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. जुही आणि इतर याचिकाकर्त्यांना उर्वरित फी जमा करण्याचे आदेशही दिल्ली उच्च न्यायालयाकडून देण्यात आले आहेत.

जुहीने काही दिवसांपूर्वी 5G नेटवर्क विरोधात दिल्ली हायकोर्टात धाव घेतली होती. या तंत्रज्ञानामुळे मानवावर आणि पर्यावर्णावर गंभीर परिणाम होण्याचा धोका असल्याचे तिचे म्हणणे होते. जुही सध्या पर्यावरण रक्षणासाठी मोठ्या प्रमाणावर कार्यरत आहे. 5G नेटवर्कच्या रेडिएशनमुळे मानवी जीवनासह प्राणी आणि वनस्पतींवर दुष्परिणाम होऊ शकेल अशी भीती जुहीने व्यक्त केली होती. त्यामुळेच तिने ही याचिका दाखल केली होती.

- Advertisement -

जुहीची याचिका न्यायमूर्ती सी हरी शंकर यांच्यासमोर मांडण्यात आली होती. ही याचिका त्यांनी दुसऱ्या खंडपीठाकडे पाठवल्यावर २ जूनला या याचिकेवर सुनावणी झाली. मात्र, त्यावेळी एका व्यक्तीने गाणी गात सुनावणीत व्यत्यय आणला होता. परंतु, आज झालेल्या सुनावणीत जुहीने 5G नेटवर्क विरोधात केलेली याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली.

- Advertisement -