घरट्रेंडिंगVideo: 'तुम्ही आपल्या देशांची अर्थव्यवस्था आहात', असं म्हणतं तळीरामांवर केला फुलांचा वर्षाव

Video: ‘तुम्ही आपल्या देशांची अर्थव्यवस्था आहात’, असं म्हणतं तळीरामांवर केला फुलांचा वर्षाव

Subscribe

दिल्लीतील एका व्यक्तीने दारू खरेदी करण्यासाठी रांगेत उभे असलेल्या तळीरामांवर फुलांचा वर्षाव केला. सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सोमवारी जवळपास ४० दिवसांनंतर दारूची दुकाने अनेक राज्यात उघडली. त्यामुळे सोमवारी दारूच्या दुकानांवर तळीरामांच्या लांबच लांब रांगा दिसून आल्या. दिल्ली, बेंगळुरू, मुंबई आणि लखनऊ यासारख्या शहरांसह देशातील विविध भागात आज काही वेगळं दृश्य पाहायला मिळालं. एका दुकानदाराने फुलांचे हार घालून ग्राहकांचे स्वागत केले. तर दुसऱ्याने नारळ फोडून ग्राहकांचे स्वागत केल्याचं पाहायला मिळाल. असंच काहीस दिल्ली देखील घडलं आहे. दिल्लीतील चंदर नगरमध्ये एका व्यक्तीने दारूसाठी रांगेत उभे असलेल्या ग्राहकांवर फुलांचा वर्षाव केला. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

व्हिडिओमध्ये पाहू शकता की, दारू घेण्यासाठी सर्व ग्राहक रांगेत उभे आहेत आणि त्याचवेळेस एक व्यक्ती त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करत आहे. त्यादरम्यानच एका ग्राहकाने त्या व्यक्तीला विचारले की, तुम्ही असं का करत आहात? मग त्या व्यक्तीने या प्रश्नाचं असं उत्तर दिलं की, तुम्ही आपल्या देशाची अर्थव्यवस्था आहात. सरकारकडे इतके पैस नाही आहेत. फुलांचा वर्षाव करणाऱ्या या व्यक्तीवर अनेक लोक हसताना दिसले. एएनआय या वृत्तसंस्थेने हा व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट केला आहे.

- Advertisement -

सोशल मीडियावर या व्हिडिओला एका तासाच्या आत ३० हजारहून अधिक व्ह्यूज मिळाले होते. तसंच या व्हिडिओ ४ हजारहून अधिक लाईक्स आणि एक हजारहून जास्त रिट्विट झाले आहेत. या व्हिडिओला नेटकऱ्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे? ते पाहा..

- Advertisement -

दिल्ली प्रमाणेच पश्चिम बंगाल, राजस्थान आणि आंध्र प्रदेशमधील विविध भागात दारू दुकाने उघडताच काही मिनिटात बंद करावी लागली. कारण सोशल डिस्टन्सिंचे उल्लंघन करताना लोक दिसून आले. सोमवारी राजधानी दिल्लीत अनेक दारूची दुकाने अनियंत्रित गर्दी आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन केल्यामुळे बंद करावी लागली. अनेक ठिकाणी गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला.


हेही वाचा – …म्हणून आनंद महिंद्रा यांनी शेअर केला दोन चाकांवर ट्रॅक्टर चालवणाऱ्याचा व्हिडिओ


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -