घरताज्या घडामोडीCorona: कोरोनाबाधितांच्या संख्येत दिल्लीने मुंबईला टाकले मागे!

Corona: कोरोनाबाधितांच्या संख्येत दिल्लीने मुंबईला टाकले मागे!

Subscribe

देशातील कोरोनाबाधितांच्या यादीत दिल्लीने तामिळनाडूला मागे टाकले असून दिल्ली आता दुसऱ्या क्रमांकावर आहे.

दिल्लीत कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढत आहे. आता दिल्लीने कोरोनाबाधितांच्या संख्येत मुंबईला मागे टाकलं आहे. आतापर्यंत दिल्लीची कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ७० हजार ३९०वर पोहोचली आहे. तर मुंबईची कोरोनाबाधितांची संख्या ६९ हजार ५२८वर पोहोचली आहे. देशातील दोन मोठ्या शहरांमध्ये कोरोनाचा फैलाव जास्त होत आहे.

आतापर्यंत दिल्लीत ४१ हजार ४३७ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. तसेच २ हजार ३६५ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर मुंबईत ३७ हजार ८ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले असून ३ हजार ९६४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या आकडेवारीनुसार तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, मुंबईच्या तुलनेत दिल्ली कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आहे. दिल्लीत पहिल्या कोरोनाबाधित रुग्णाची नोंद २ मार्चला झाली होती. तर मुंबईत पहिल्या कोरोनाबाधित रुग्णाची नोंद ११ मार्च झाली आहे. तसेच दिल्लीत पहिल्या कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू १२ मार्चला तर मुंबई १९ मार्चला झाला होता. दिल्लीच्या आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, मुंबईपेक्षा आधी दिल्ली कोरोनाबाधित रुग्ण आढळला असला तरी राजधानीत कोरोनाचा धोका कमी झाला आहे.

- Advertisement -

देशातील आतापर्यंत कोरोनाबाधितांचा संख्या ४ लाख ७३ हजार १०५ वर पोहोचली असून मृतांची संख्या १४ हजार ८९४ झाली आहे. तसेच १४ तासांत १३ हजार १२ रुग्ण बरे झाले असून रिकव्हरी रेट ५७.४२ टक्के आहे. देशात आतापर्यंत २ लाख ७१ हजार ६९७ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर सध्या १ लाख ८६ हजार ५१४ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.


हेही वाचा – Corona: अमेरिकेपेक्षा ब्राझीलमध्ये कोरोनाबाधित आणि मृतांच्या संख्येत सर्वाधिक वाढ!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -