घरदेश-विदेशमेट्रोच्या दरवाज्यात महिलेची साडी अडकली आणि मेट्रो सुरु झाली

मेट्रोच्या दरवाज्यात महिलेची साडी अडकली आणि मेट्रो सुरु झाली

Subscribe

दिल्ली मेट्रोच्या दरवाजामध्ये एका महिलेची साडी अडकल्याने एक ४० वर्षीय महिला जखमी झाली आहे. दिल्लीच्या मोतीनगर मेट्रो स्टेशनवर ही घटना घडली आहे.

दिल्ली मेट्रोच्या समोर उडी मारुन एका व्यक्तीने आत्महत्या केल्याची घटना ताजी असताना आज पुन्हा एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दिल्ली मेट्रोच्या दरवाजामध्ये एका महिलेची साडी अडकल्याने एक ४० वर्षीय महिला जखमी झाली आहे. दिल्लीच्या मोतीनगर मेट्रो स्टेशनवर ही घटना घडली आहे. महिला मेट्रोमधून उतरत असताना या महिलेचा पदर मेट्रोच्या दरवाजामध्ये अडकला आणि मेट्रो सुरु झाली. दरम्यान, या महिलेला काही अंतरापर्यंत महिलेला खेचत नेले. या घटनेमध्ये सुदैवाने महिला वाचली तिच्या डोक्याला गंभीर जखम झाली आहे. या घटनेमुळे पुन्हा दिल्ली मेट्रोवरील प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

अशी घडली घटना

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी ९.२० वाजता मोतीनगर मेट्रो स्टेशनवर गाझियाबादच्या दिशेने जाणारी मेट्रो थांबली. ट्रेनमधून उतरताना गीता (४०) या महिलेची साडी मेट्रोच्या दरवाज्यात अडकली. तोवर मेट्रो सुरु झाली. गीता यांनी साडी सोडवण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत मेट्रो सुरु झाली होती. त्यामुळे त्या मेट्रोसोबत काही अंतरापर्यंत मेट्रोसोबत खेचत गेल्या. महिलेचे पती जगदीश प्रसाद यांनी सांगितले की, ‘गीता आणि माझी मुलगी मेट्रोने प्रवास करत होते. मोतीनगर मेट्रो स्टेशनवर उतरताना गीताच्या साडीचा पदर दरवाजा बंद होताना अडकला. त्यानंतर मेट्रो सुरु झाली आणि माझी पत्नी काही अंतरापर्यंत मेट्रोसोबत घसरत गेली.’ दरम्यान, या घटनेनंतर २० मिनिटं मेट्रोची वाहतूक विस्कळीत झाली होती.

- Advertisement -

महिलेवर उपचार सुरु

दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनने दिल्ली मेट्रो प्रवाशांसाठी सुरक्षित असल्याचा वारंवार दावा केला आहे. मात्र आज घडलेल्या घटनेमुळे दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनची पोलखोल झाली आहे. डीएमसीआरने दावा केला आहे की, जर एखादी वस्तू मेट्रोच्या दरवाज्यात आली तर दरवाजा बंद होत नाही त्यामुळे मेट्रो सुरु होण्याचा प्रश्नच येत नाही. मेट्रोच्या या दाव्याच्या उटल आज मोतीनगर मेट्रो स्टेशनवर ट्रेनमधून एक महिला उतरताना जखमी झाली. दरम्यान, स्टेशनवर उपस्थित लोकांनी आरडाओरडा करत मेट्रो ट्रेनला थांबवले त्यामुळे सुदैवाने महिलेचा जीव वाचला. दरम्यान, महिला जखमी झाली असून तिच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु असून तिची प्रकृती स्थिर आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -