Friday, February 26, 2021
27 C
Mumbai
घर देश-विदेश दीड वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून केली हत्या; आरोपीला थेट चढवलं फासावर

दीड वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून केली हत्या; आरोपीला थेट चढवलं फासावर

आरोपीला नुसती फाशीची शिक्षाच नाही तर त्याला दोन लाख रुपयांचा दंडही ठोठावला

Related Story

- Advertisement -

उत्तर प्रदेशमधील हरदोई जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आलांय. ७ वर्षांपूर्वी अवघ्या १८ महिन्यांच्या म्हणजेच दीड वर्षाच्या चिमुकलीवर एका व्यक्तीनं बलात्कार केला आणि तिची हत्या केल्याचेही सांगितले जात आहे. या घटनेतील आरोपीला जिल्हा सत्र न्यायालयानं थेट फासावर चढवण्य़ाची शिक्षा सुनावली आहे. नुसती शिक्षाच नाही तर त्याला दोन लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे. या निर्णयाला ऐतिहासिक असल्याचे वकिलांनी सांगितले. यामुळे निर्णयामुळे समाजात एक कठोर संदेश जाईल आणि महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना कमी होण्यास मदत होईल असेही वकिलांनी म्हटले आहे.

असा घडला प्रकार

देहात कोतवाली ठाण्याच्या क्षेत्रात एका गावात २०१४ साली १८ महिन्यांच्या चिमुकलीला गावातीलच एका व्यक्तीनी तिच्या घरुन उचलून नेलं. यानंतर त्यानं मुलीवर बलात्कार करुन तिची हत्या केली होती. हा प्रकार कोणाच्याही लक्षात येऊ नये म्हणून आरोपीने या चिमुकलीचा मृतदेह तलावात फेकला. चिमुकली घरातून बेपत्ता झाल्याचे लक्षात येताच कुटुंबियांनी तिचा शोध सुरू केला. कुठेही दिसेनासी झाल्याने तिची माहिती पोलिसांना दिली. यावेळी तात्काळ घटनास्थळी धाव घेत चिमुकलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आणि आरोपीला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती मिळतेय.

- Advertisement -

गेल्या ७ वर्षापूर्वी घडलेल्या घटनेसंदर्भात गेल्या अनेक दिवसांपासून या प्रकरणावर न्यायालयात सुनावणी सुरू होती. अखेर सोमवारी उत्तरप्रदेशातील हरदोईच्या अप्पर सत्र आणि जिल्हा न्यायालयाच्या कोर्टात आरोपीला फासावर चढवण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. दरम्यान, या निर्णयाला ऐतिहासिक निर्णय असल्याचे म्हणत सगळ्यांकडूनच कौतुक केले जात आहे.


- Advertisement -