घरCORONA UPDATECorona: 'कोरोनावरची लस बनो न बनो, अमेरिका लॉकडाऊनमुक्त होणार'

Corona: ‘कोरोनावरची लस बनो न बनो, अमेरिका लॉकडाऊनमुक्त होणार’

Subscribe

जगात सर्वाधिक कोरोनाचा हाहाकार अमेरिकेत पाहायला मिळत आहे. अमेरिकेत दररोज हजारोच्या संख्येने कोरोना रुग्णांचा मृत्यू होत आहे. मात्र गेल्या दोन महिन्यांहून अधिक काळापासून लॉकडाऊन असलेला हा देश आता लॉकडाऊनमुक्त होणार आहे. असे संकेत स्वतः राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले आहे. कोरोनावर जगभरातून लस बनवण्यासाठी संशोधन सुरू आहे. परंतू कोरोनावर लस बनो वा न बनो अमेरिका खुली होणार, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. बीबीसीने शनिवारी दिलेल्या माहितीनुसार अमेरिकेने लसीकरण प्रोजेक्टची ऑपरेशन वॉर्प स्पीड म्हणजेच दुसऱ्या महायुद्धात जगात पहिल्यांदा बनवण्यात येणाऱ्या परमाणू शस्त्राच्या प्रयत्नाशी तुलना केली आहे. तरीही या वर्षाच्या अखेरपर्यंत कोरोनावरील लस बनवण्याचा त्यांचा उद्देश असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा – आमच्या प्रयोगशाळांनी कोरोनाच्या सुरुवातीच्या रुग्णांचे नमुने नष्ट केले – चीन

- Advertisement -

शास्त्रज्ञांनी केली शंका उपस्थित

अमेरिकेतील नागरिकांना आता पहिल्यासारखे आयुष्य हवे आहे. लॉकडाऊनमधून त्यांना मुक्त व्हायचे आहे. त्यामुळे लस बनण्याची वाट पाहणे निरर्थक आहे. एका वर्षात कोरोनावरील लस बनेल यावर कित्येक शास्त्रज्ञांनी शंका व्यक्त केली आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रारी व्हाइट हाऊसमधील रोज गार्डनमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत म्हटले होते की, १४ लसीकरण कॅन्डिडेटवर संशोधन आणि त्याचे अनुमोदन यानंतर त्याची अंमलबजावणी होईल. एक लस बनवण्यापासून ती वितरीत करून सरकारी आणि खासगी क्षेत्रांमधील समन्वय या सर्व बाबींवर ट्रम्प यांनी यावेळी भाष्य केले. दरम्यान, ही प्रक्रिया करण्यासाठी नेमलेल्या जनरल आणि माजी आरोग्य विभाग अधिकारी यांचे नावही त्यांनी घोषित केले. यावेळी जगभरात २०२० पर्यंत काही हजार लसींते वितरण केले जाईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. आतापर्यंत जगभरात ४६ लाख ६० हजाराहून अधिक जण कोरोनाबाधित झाले आहेत. तर ३ लाख १० हजार जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. अमेरिकेत या विषाणूमुळे सर्वाधिक नुकसान झाले असून आतापर्यंत ८८ हजार ५०० लोकांचा मृत्यू झाला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -