घरCORONA UPDATEजागतिक कोरोना अपडेटआमच्या प्रयोगशाळांनी कोरोनाच्या सुरुवातीच्या रुग्णांचे नमुने नष्ट केले - चीन

आमच्या प्रयोगशाळांनी कोरोनाच्या सुरुवातीच्या रुग्णांचे नमुने नष्ट केले – चीन

Subscribe

चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाचे वैद्यकीय अधिकारी लियू डेंगफेंग यांनी शुक्रवारी कोरोना विषाणूचे नमुने नष्ट केल्याचा आरोप मान्य केला.

कोरोना कोरोना रूग्णांचे प्रारंभिक नमुने नष्ट केल्याचं चीनने हे मान्य केलं आहे. चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाचे वैद्यकीय अधिकारी लियू डेंगफेंग यांनी शुक्रवारी मान्य केलं की चीनी सरकारने ३ जानेवारी रोजी अनधिकृत लॅबमधून कोरोना विषाणूचे नमुने नष्ट करण्याचा आदेश जारी केला होता. जैविक सुरक्षा कारणास्तव असं करणं आवश्यक होतं असं कारण दिलं आहे.

तथापि, कोरोनाची माहिती लपवण्याच्या उद्देशाने विषाणूचे नमुने चीनने नष्ट केल्याचा आरोप चीनवर केला आहे. मात्र, हा आरोप फेटाळला आहे. लियू डेंगफेंग यांनी दावा केला आहे की, “प्रयोगशाळेत जैविक सुरक्षा आणि यापुढे कोणतीही दुर्घटणा घडू नये, म्हणून विषाणूचे नमुने नष्ट करायला सांगितले गेले.” चीनच्या नॅशनल हेल्थ कमिशनच्या अधिकाऱ्याने शुक्रवारी बीजिंगमध्ये पत्रकार परिषदेत विषाणूचे नमुने नष्ट केल्याची माहिती दिली. लियू डेंगफेंग म्हणाले की अशा नमुन्यांसाठी लॅब अनधिकृत होती आणि त्यांना चीनच्या आरोग्य कायद्यानुसार विषाणूचे नमुने नष्ट करावे लागले.

- Advertisement -

हेही वाचा – गरिबांच्या खात्यात १६ हजार ३९४ कोटी जमा – अर्थमंत्री


गेल्या महिन्यात अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पोम्पीओ म्हणाले की, चीनचा ३ जानेवारीचा आदेश हा साथीचा रोग लपविण्याचा प्रयत्न करण्याचा होता. माईक पोम्पीओ म्हणाले होते की, “चीनच्या कम्युनिस्ट पक्षाने विषाणूशी संबंधित माहिती दडवण्याचा प्रयत्न केला. हा विषाणू कुठून पसरला, त्याचा प्रसार कसा झाला आणि मानवांकडून मनुष्यांना संसर्ग कसा होत आहे, याबद्दल माहिती लपवत आहे. आणि या कामात who देखील मदत करत आहे.”

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -