घरदेश-विदेश'या' भारतीय महिलेमुळे ट्रंप याचे ट्विटर अकाउंट झाले बंद

‘या’ भारतीय महिलेमुळे ट्रंप याचे ट्विटर अकाउंट झाले बंद

Subscribe

विजया या ट्विटरच्या कायदेशीर,धोरणांविषयीच्या तज्ज्ञ आहेत.

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांचे ट्विटर अकाउंट कायमस्वरूपी संस्पेंड करण्यात आले आहे. ट्रंप यांचे अकाउंट बंद करण्यासाठी एका भारतीय महिलेचा महत्त्वाचा वाटा आहे. ४५ वर्षांच्या विजया यांच्या महत्त्वाच्या भूमिकेमुळे ट्रंप यांचे ट्विटर अकाउंट बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. विजया या ट्विटरच्या कायदेशीर,धोरणांविषयीच्या तज्ज्ञ आहेत. त्याचबरोबर कंपनीच्या सुरक्षा आणि विश्वासर्हतेच्या संबंधित विभागाच्या प्रमुख आहेत.

गेल्या आठवड्यात अमेरिकेच्या इलेक्टोरल वोटच्या काउंटिंगच्या दरम्यान डोनाल्ड ट्रंप यांनी नवे संकंट समोर आणून ठेवले होते. त्यामुळे ट्विटर या सोशल मीडिया कंपनीने ट्रंप यांचे ट्विटर अकाउंट सस्पेंड केले. ट्रंप हे त्यांची कोणतीही माहिती सांगण्यासाठी वारंवार ट्विट करत होते. त्यांच्या या वागण्यावर काही तरी निर्णय घेण्याची वेळ होती. त्यामुळे ट्विटरने त्यांचे अकाउंट कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेतला. भारतीय वंशाच्या परंतु अमेरिकेत जन्माला आलेल्या विजया गड्डे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. ट्रंप ट्विटच्या माध्यमातून यूएस कॅपिटलमध्ये दंगे घडवून त्यांना पाठिंहा देत होते. भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी डोनाल्ड ट्रंप यांचे अकाउंट सस्पेंड करणे गरजेचे होते, असे विजया यांनी सांगितले.

- Advertisement -

कोण आहेत विजया गड्डे?

विजया गड्डे यांचा जन्म भारतात झालेला आहे. लहानपणीच त्या आपल्या कुटुंबासोबत अमेरिकेला निघून गेल्या. त्यांचे वडिल मॅक्सिकोमध्ये ऑइल रिफायनरीमध्ये केमिकल इंजीनीअर होते. विजया यांनी न्यू जर्सीमध्ये शालेय शिक्षण घेतले. कॉर्नेल यूनिव्हरसिटीमधून त्यांनी त्यांचे ग्रॅज्युएशन केले. त्याचप्रमाणे न्यूयॉर्क यूनिवर्सिटी ऑफ लॉ मधून त्यांनी उच्च शिक्षण प्राप्त केले. २०११मध्ये त्यांनी कॉर्पोरेट लॉयर ट्विटर जॉईन केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -