घरदेश-विदेशमहिला प्रवेशानंतर शबरीमाला मंदिराचे शुध्दीकरण

महिला प्रवेशानंतर शबरीमाला मंदिराचे शुध्दीकरण

Subscribe

४० वर्षाच्या दोन महिलांनी शबरीमाला मंदिरामध्ये प्रवेश करुन अयप्पाचे दर्शन घेतले. त्यामुळे आता मंदिर शुध्दिकरणासाठी बंद करण्यात आले आहे. शुध्दिकरण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मंदिराचे दरवाजे खोलण्यात आले.

केरळच्या प्रसिध्द शबरीमाला मंदिराचे दरवाजे बंद करण्यात आले आहेत. शबरीमाला मंदिरामध्ये आज पहाटे दोन महिलांनी प्रवेश करत अयप्पाचे दर्शन घेतल्याचा दावा केला. त्यामुळे शुध्दिकरणासाठी मंदिराचे दरवाजे बंद करण्यात आले आहेत. २८ सप्टेंबर २०१८ रोजी सुप्रीम कोर्टाने ऐतिहासिक निर्णय दिला होता. केरळच्या शबरीमाला मंदिरामध्ये सर्व वयोगटातील महिलांना प्रवेश देण्यात यावा असे आदेश कोर्टाने दिले होते. त्यानंतर अनेक महिलांनी मंदिरामध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना मंदिर प्रवेशाला विरोध करण्यात आला.

- Advertisement -

शबरीमाला मंदिराचे शुध्दीकरण 

आज पहाटे ३.४५ दरम्यान ४० वर्षाच्या दोन महिलांनी शबरीमाला मंदिरामध्ये प्रवेश करुन अयप्पाचे दर्शन घेतले. त्यामुळे आता मंदिर शुध्दिकरणासाठी बंद करण्यात आले आहे. शुध्दिकरण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मंदिराचे दरवाजे खोलण्यात येणार आहे. कडक पोलीस बंदोबस्तात या महिलांनी मंदिरामध्ये प्रवेश केला. केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांनी यासंदर्भात असे सांगितले आहे की, सरकारने पोलिसांनी निर्देश दिले होते की, ज्या महिला मंदिरामध्ये जाऊ इच्छितात त्यांना सुरक्षा दिली जावी असे सांगण्यात आले होते.


हेही वाचा – VIDEO: शबरीमाला मंदिराची ऐतिहासिक परंपरा मोडली

- Advertisement -

पोलीस बंदोबस्तात मंदिर प्रवेश 

असे सांगितले जातेय की, ज्या महिलांनी आज मंदिरामध्ये प्रवेश केला त्या महिलांनी मागच्या महिन्यातही मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यांना मंदिर प्रवेशाला विरोध करण्यात आला होता. त्यामुळे त्या पुन्हा गेल्या होता. अखेर त्यांनी आज म्हणजे २ जानेवारीला पहाटे ३.४५ वाजता मंदिरात प्रवेश करत दर्शन घेतले. याच्या एक दिवस आधीच मानवी साखळी बनवणाऱ्या महिला, पोलीस आणि मीडियावर भाजप-आरएसएसच्या काही कथिक कार्यकर्त्यांनी दगडफेक केली. त्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज करत आंदोलनकर्त्यांना हटवले होते.

महिला प्रवेशाविरोधात आंदोलन

केरळच्या शबरीमाला मंदिरात दोन महिलांनी प्रवेश केल्याच्याविरोधात केरळमध्ये आंदोलन करण्यात आले आहे. केरळमध्ये भाजपच्या ५ महिला कार्यकर्त्यांनी तिरुअनंतपुरम येथे आंदोलन केले. दरम्यान पोलिसांनी त्यांना रोखले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -