घरताज्या घडामोडीCoronavirus: DRDOने विकसित केलेले कोरोना प्रतिबंध औषध 2-DG आजपासून मिळणार

Coronavirus: DRDOने विकसित केलेले कोरोना प्रतिबंध औषध 2-DG आजपासून मिळणार

Subscribe

देशभरात कोरोना दुसऱ्या लाटेने कहर केला आहे. त्यामुळे आता कोरोना लसीसह कोरोना प्रतिबंधात्मक औषधाच्या आपात्कालीन वापरासाठी ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DGCI) मंजूरी दिली जात आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO)ने विकसित केलेल्या कोरोना प्रतिबंधक औषध २ डीऑक्सिजी-डी ग्लुकोज ((2-DG) 2-deoxy-D-glucose ) ला काही दिवसांपूर्वी डीजीसीआयने आपात्कालीन वापरासाठी मान्यता दिली होती. आजपासून 2-DG कोरोनावरील औषध उपलब्ध होणार आहे. या औषधाच्या पहिल्या खेपचे उद्घाटन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांच्या हस्ते आज सकाळी १०.३० वाजता व्हिसीच्या माध्यमातून झाले.

- Advertisement -

हैदराबाद स्थित डॉ. रेड्डीज लॅबोरिटरीजमध्ये डीआरडीओने या औषधाचे १० हजार डोस तयार केले आहेत. तसेच येत्या जून महिन्यापासून दर आठवड्याला एक लाख डोस तयार करण्यास सुरुवात करणार आहेत. हे औषध पाण्यात विरघळणारे असून लवकरच हे औषध इतर रुग्णालयातही उपलब्ध होणार आहेत.

डीआरडीओच्या इन्स्टिट्यूट ऑफ न्युक्लिअर मेडिसिन अँड अलाईड सायन्सेस (INMAS) आणि हैदराबाद स्थित डॉ. रेड्डीज लॅबोरिटरीजच्या सहकार्याने 2-DG हे कोरोना प्रतिबंधात्मक औषध तयार केले आहे. गेल्या वर्षभरापासून या औषधाच्या क्लिनिकल ट्रायल सुरू होत्या. विशेष म्हणजे ज्या रुग्णांवर या औषधाचा प्रयोग करण्यात आला, त्यातील ४२ टक्के रुग्णांना तिसऱ्या दिवशी ऑक्सिजनची गरज भासली नाही. तसेच ते रुग्ण लवकरच बरे झाले. शिवाय या औषधाचा ६५ वर्षांवरील रुग्णांवरही चांगला प्रभाव दिसून आला. हे औषध इंजेक्शन नसून तोंडाद्वारे घेता येणारे आहे.

- Advertisement -

हेही वाचा – ‘या’ गावात मृत्यूचे तांडव; प्रत्येक घरातून बाहेर पडतात ३ मृतदेह!


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -