घरताज्या घडामोडी'या' गावात मृत्यूचे तांडव; प्रत्येक घरातून बाहेर पडतात ३ मृतदेह!

‘या’ गावात मृत्यूचे तांडव; प्रत्येक घरातून बाहेर पडतात ३ मृतदेह!

Subscribe

एका महिन्यात उत्तर प्रदेशचे अमेठी जिह्यातील हारीमऊ नावाच्या एका गावात २० लोकांच्या मृत्यूने दहशत माजली आहे. इतक्या जणांचा मृत्यू होऊनही आरोग्य विभाग त्याबाबत तपास करत नाही आहेत, असा गावकऱ्यांनी आरोप केला आहे. गावकऱ्यांचे म्हणणे आहे की, आतापर्यंत गावामध्ये कोणतीही चाचणी झाली नाही किंवा सॅनिटायझेशन केलेले नाही आहे. पण आरोग्य विभागाने गावकऱ्यांचे हे आरोप फेटाळून लावले आहेत. आरोग्य विभागाने सांगितले की, गावांमध्ये कोरोनाची लक्षणे असलेल्या व्यक्तींची ओळख पटवली जात आहे आणि सातत्याने सॅनिटायझेशन केले जात आहे.

दरम्यान केंद्रीय मंत्री स्मृती इराणी लोकसभा मतदार संघ अमेठीच्या जगदीशपूर स्थिती हारीमऊमध्ये एका महिन्यात २० लोकांचा जीव गेला आहे. यामुळे संपूर्ण गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गावकरी या मृतांबाबत आश्चर्यचकीत झाले आहे. गावकऱ्यांना हे कसे झाले याबाबत माहित नाही. परंतु एका महिन्यात इतक्या जणांचा मृत्यू कोणीच पाहिला नाही, असे गावातल्या लोकांचे म्हणणे आहे.

- Advertisement -

हारीमाऊ गावाचा रहिवाशी राजेंद्र कौशल म्हणाला की, १७ ते १८ जणांचा मृत्यू झाला आहे, हे खरं आहे. एक एक घरातून तीन-तीन मृतदेह बाहेर पडत आहे. रुग्णवाहिकेला फोन केला जातो, ती येत. ते रुग्णाला उचलत देखील नाही. जर घरातल्यांनी उचलले नाहीतर रुग्णवाहिका परत जाते. तसेच रुग्णांना औषधं देतात आणि निघू जातात.

अजून एका गावात राहणाऱ्या शहनवाज सांगितले की, कोणत्या कारणांमुळे मृत्यू होत आहे, ते समजत नाही आहे. परंतु आरोग्य विभागाची टीम येते आणि औषधं देऊ जाते. ना कोणाची तपासणी झाली, ना सॅनिटाझेशन. लोकं घाबरली आहेत. या गावाचे प्रमुख मोतीलाल म्हणाले की, ‘आमच्या गावात जवळपास २० मृत्यू झाले. कोणत्या कारणामुळे मृत्यू झाले याबाबत माहित नाही, फक्त आरोग्य विभागाची टीम आली आणि गेली. त्या टीमने फक्त रुग्णालयात औषधं दिली.’

- Advertisement -

या संपूर्ण प्रकरणावर अमेठी मुख्य वैद्यकीय अधिकारी (सीएमओ) आशुतोष दुबे म्हणाले की, ‘लसीकरणासाठी गावकऱ्यांना आरोग्य केंद्रावर यावे लागते. लसीकरणाचे काही प्रोटोकॉल आहेत. गावात लस दिली जावू शकत नाही. पूर्ण गावात सॅनिटाझेशन केले गेले आहे. लक्षणे असलेल्या व्यक्तींना औषधं दिली गेली आहेत आणि चाचण्या देखील केल्या जात आहेत.’


हेही वाचा – Corona Vaccine: कोरोनाच्या सर्व नव्या स्ट्रेनवर Covaxin असरदार – ऑक्सफर्ड जर्नल


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -