घरताज्या घडामोडीe-VIDYA Scheme : काय आहे मुलांसाठी लाभदायक ठरणारी प्रधानमंत्री e -VIDYA योजना...

e-VIDYA Scheme : काय आहे मुलांसाठी लाभदायक ठरणारी प्रधानमंत्री e -VIDYA योजना ?

Subscribe

आज मंगळवारी 1 फेब्रुवारीला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी 2022 -23 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. कोरोनाच्या कार्यकाळात दूसऱ्यांदा डिजीटल माध्यमातूनच यंदाचेही अर्थसंकल्प डिजीटल माध्यमातून झाले. हा अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्र्यांनी डिजिटल शिक्षणाला प्रोत्साहन देत 'पंतप्रधान e -VIDYA' योजनेची घोषणा केली. अर्थमंत्र्यांनी सांगितले की, कोरोनासारख्या जागतिक महामारीमुळे शाळा, महाविद्यालये आणि इतर शैक्षणिक संस्था या बराच काळ बंद राहिल्या.

आज मंगळवारी 1 फेब्रुवारीला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी 2022 -23 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. कोरोनाच्या कार्यकाळात दूसऱ्यांदा डिजीटल माध्यमातूनच यंदाचेही अर्थसंकल्प डिजीटल माध्यमातून झाले. हा अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्र्यांनी डिजिटल शिक्षणाला प्रोत्साहन देत ‘पंतप्रधान e -VIDYA’ योजनेची घोषणा केली. अर्थमंत्र्यांनी सांगितले की, कोरोनासारख्या जागतिक महामारीमुळे शाळा, महाविद्यालये आणि इतर शैक्षणिक संस्था या बराच काळ बंद राहिल्या. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षण पद्धतीवर मोठ्या प्रमाणात याचा दुष्परिणाम झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. प्रामुख्याने ग्रामीण भागात अनुसूचित जाति आणि अनुसूचित जमातींसह इतर दुर्बल घटकांतील विद्यार्य्थांच्या शिक्षणावर कोरोनामुळे मोठ्या प्रमाणात परिणाम झाल्याचे पाहायला मिळत आहे.

200 टिव्हीच्या माध्यमातून शिक्षण घेतले जाईल

कोरोना महामारीमुळे बहुतांश सरकारी शाळांमधील मुलांच्या शिक्षणावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत अव्यवस्थित झालेली शिक्षणपद्धती रुळावर आणण्यासाठी पंतप्रधान ई-विद्या लागू करण्यात आली. या योजनेअंतर्गत वन क्लास वन टीव्ही कार्यक्रमात विद्यार्थ्यांना शिकवण्याचे काम 12 वरुन 200 टिव्ही चॅनेलवर वाढवले जाणार आहे. कारण अनेक भागात इंटरनेट नसल्यामुळे अनेक मुलांना ऑनलाइन शिक्षणात अडथळा निर्माण झाल्याचे चित्र अनेक ठिकाणी पाहायला मिळते. त्यामुळे टिव्ही अनेकांकडे उपलब्ध असल्यामुळे नागरिक पाहत असलेल्या प्रादेशिक भाषांच्या टिव्ही चॅनलच्या माध्यमातून प्रादेशिक भाषांमध्ये शिक्षण दिले जाणार आहे.

- Advertisement -

यंदाचे अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्र्यांनी सांगितले की, सन 2022-23 मध्ये विद्यार्थ्यांच्या कौशल्याला चालना देण्यासाठी या योजनेतून प्रयत्न केले जातील. विज्ञान आणि गणिताच्या भाषामध्ये 750 वर्चुअल लॅब आणि 75 कौशल ई- प्रयोगशाळा सुरु करण्यात येणार आहे. डिजीटल शिक्षणाला प्रोत्साहन देत शिक्षकही डिजिटल प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होणार आहेत. उच्च दर्जाचे ई-शिक्षण साहित्य विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रादेशिक भाषांमध्ये इंटरनेट ,मोबाईल फोन,टीव्ही रेडिओ यावर उपलब्ध होणार आहे. म्हणजेच प्रत्येक विभागात राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रादेशिक भाषेत शिक्षण सुरु होणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी डिजिटल विद्यापीठाची स्थापना केली जाईल. म्हणजेच आता विद्यापीठ प्रत्येक विद्यार्थ्याच्या दारात असेल, विद्यार्थ्याला वैयक्तिकरित्या शिक्षण दिले जाईल. डिजिटल विद्यापीठात सर्व भारतीय भाषांमध्ये आणि आयसीटी फॉरमॅटमध्ये शिक्षण उपलब्ध होईल.


हे ही वाचा – Waris Pathan : एमआयएमचे माजी आमदार वारीस पठाण यांच्या तोंडाला एका अज्ञात तरूणाने काळं फासलं

- Advertisement -

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -