घरदेश-विदेशकॅडबरी खा ! डेटा मिळवा

कॅडबरी खा ! डेटा मिळवा

Subscribe

५ रुपयांच्या कॅडबरीवर जिओचा १ जीबी डेटा फ्री

रिलायन्स जिओ नेहमीच आपल्या ग्राहकांना खुश करण्यासाठी काही ना काही नवीन ऑफर्स देत असते.तसेच आपली सेवा ग्राहकांपर्यंत पोहचवण्यासाठी नवनव्या शक्कल घेऊन येत असते. याच धर्तीवर जिओने ग्राहकांसाठी आता एक हटके आणि तितकीच आकर्षक ऑफर आणली आहे. जिओच्या या ऑफरनुसार तुम्हाला ५ रुपयांची कॅडबरी खरेदी केल्यावर चक्क १ जीबी डेटा फ्री मिळणार आहे. जिओ कंपनी आपल्या दुसर्‍या वर्षात पदार्पण करत असून यानिमित्ताने त्यांनी ही भन्नाट ऑफर दिल्याचे समजत आहे. मात्र, या ऑफरचा लाभ घेण्यासाठी तुम्ही केवळ जिओचे ग्राहक असून उपयोगाचे नाही. तर फ्री डेटा मिळवण्यासाठी तुमच्याकडे माय जिओ अ‍ॅप असणे देखील आवश्यक आहे. १ जीबी फ्री डेटा मिळवण्यासाठी तुम्ही ५ रुपयांची डेअरी मिल्कची कॅडबरी, रोस्टेड आलमंड, मिल्क फ्रूट अँड नट किंवा लिकेबल्स यापैकी कोणतेही चॉकलेट खरेदी करू शकता. यामध्ये तुम्ही ५ रुपयांपासून ते १० रु., २० रु., ४० रु. आणि १०० रुपयापर्यंतची डेअरी मिल्क चॉकलेट्स खरेदी करू शकता.

‘असा’ मिळेल फ्री डेटा

वर नमूद केलेल्या कुठल्याही चॉकलेटचे रॅपर तुम्हाला सांभाळून ठेवायचे आहे. दरम्यान, तुमच्या मोबाईलवर फ्री डेटा अ‍ॅक्टिव्हेट करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला माय जिओ अ‍ॅपवर जावे लागेल. अ‍ॅपच्या होमस्क्रीनवर तुम्हाला या ऑफरचे बॅनर दिसेल. त्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर participate now असा ऑप्शन येईल. या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्या चॉकलेट रॅपरवरील बारकोड स्कॅन करायचा आहे. बारकोड यशस्वीपणे स्कॅन झाल्यानंतर लगेचच तुमच्या नंबरवर १ जीबीचा फ्री डेटा अ‍ॅक्टिव्हेट होईल. ही विशेष ऑफर केवळ ३० सप्टेंबरपर्यंतच मर्यादित आहे. हा डेटा तुमच्या आधीच्या डेटाव्यतिरिक्तचा एक्स्ट्रा डेटा असल्यामुळे तुम्ही अधिकचा डेटा वापरू शकणार आहात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -