घरअर्थजगतमुलांच्या भवितव्यासाठी म्युच्युअल फंडातील गुंतवणूक

मुलांच्या भवितव्यासाठी म्युच्युअल फंडातील गुंतवणूक

Subscribe

शिक्षण -कपडालत्ता -सर्वसाधारण करमणूक अशा अनेक बाबी आहेत आणि या मुलांच्या वाढत्या वयाबरोबर वाढतच जाणार आहेत.तेव्हा पालक म्हणून आपण किती पैसा उभा करणार आहोत?आणि कसा उभा करणार? याकरिता आर्थिक तरतूद करणे गरजेचे आहे. इतर पारंपरिक मार्ग असताना ‘म्युचुअल फंड’ गुंतवणूक मुलांच्यासाठी कशी उपयोगी पडू शकते हे आज आपण पाहणार आहोत.

आज बहुतेक दोघेही पालक नोकरी करणारे असतात, अर्थात असंख्य अपवाद असतीलच. पण प्रापंचिक गरजा आणि खर्च वाढते असतात, त्यात भर पडत असते ती अक्राळविक्राळ महागाईची. एकाच्या नोकरीत संसार चालवणे सोप्पे नसते. कमावणारा एक असो की दोघे परंतु काही खर्चाच्या मुद्यावर ‘तडजोड’ हा शब्दच नसतो. त्यापैकी एक म्हणजे मुलांचे शिक्षण आणि दुसरा म्हणजे घरातील ज्येष्ठांचे आरोग्य. मुलांना वाढवणे आणि शिक्षण देणे हे आता बर्‍यापैकी कॉस्टली अफेअर झालेले आहे. अर्थात कितीही खर्च करावा लागला तरी चालेल, पण आम्ही आमच्या बाबुला किंवा बेबीला इंग्रजी माध्यमाच्या बड्या स्कूलमध्येच घालणार. महत्वाचा मुद्दा हा की, आजकाल मुलांसाठी आपण खर्चाला मागेपुढे पहात नाही.मॉलमध्ये नेऊ,मल्टीप्लेक्सला लावू आणि भरपूर खर्च करू. कारण मुलांना असे वाटता नये की, आपले पालक गरीब आहेत.

मुलांसाठी आर्थिक तरतूद का करायला हवी ?

  • वाढता खर्च – मुल जसजसे मोठे होत जाते तसतसे अनेक प्रकारचे खर्च वाढत असतात
  • वाढती महागाई – आपल्या अर्थव्यवस्थेचे आजचे चित्र पाहता,आपल्याकडे महागाई कमी होणे तसे अशक्यच.महागाई रोखण्याचे प्रयत्न आणि वाढण्याची असंख्य कारणे यात कायमच तफावत राहणार. म्हणून आपल्याला व्यक्ती आणि कुटुंब पातळीवर प्रयत्न करणे जरुरीचे आहे. प्रतिवर्षी वाढत जाणारी महागाई समजा अमुक टक्के आहे,तर आपल्याला तितके उत्पन्न कमवावे लागणार आहे.
  • शिक्षण खर्च अस्मानी – आपल्याकडे महागाई सर्व अंगांनी वाढत असताना शिक्षण-क्षेत्र मागे कसे राहील? आपण जेव्हा शाळा-कॉलेजात असताना किती फी होती ?अर्थात ती फीदेखील परवडणारी परिस्थिती नव्हती!! पण आजची नर्सरी पातळीवरची फी किती असते? मग अजून दहा वर्षांनी महाविद्यालयीन खर्च किती वाढेल? म्हणून आपल्याला अधिक मिळकत निर्माण करायला हवी.
  • कुटुंबाची जबाबदारी – जसजशी वर्षे वाढत जातात,तसे घरातील माणसांचे खर्च वाढू लागतात.दैनंदिन गरजा, खाणेपिणे, कपडालत्ता, औषधे, प्रवास, किरकोळ खर्च अशी अनेक तोंडे आ वासून उभी असतात.आपले उत्पन्नच जर मोजके असेल तर वाढता खर्च -त्याची तोंडमिळवणी करणार कशी?
  • आकस्मिक खर्च – हल्ली हॉस्पिटल किंवा मेडिकलचा खर्च खूप महाग झालेला आहे, घरातील एकाचे जरी असे अचानक आजरपण उद्भवले तर घरातील बजेट कोलमडू शकते. म्हणून काही महत्त्वाचे खर्च असतात, त्यासाठी तरतूद असणे सोयीचे असते.

मुलांसाठी काही पारंपरिक गुंतवणूक साधने – आजवर आपल्या आई-वडिलांच्या काळात काही साधने होती. उदाहरणार्थ – पी.पी.एफ., पोस्टाच्या काही योजना.आजदेखील अशा काही योजना उपलब्ध आहेत. परंतु काळाच्या ओघात अधिक उत्पन्न देणारी योजना आपल्याला सोयीची आणि हवीहवीशी वाटते. म्हणूनच बँकेतील मुदत ठेवी किंवा रिकरिंग डिपोझीट यांच्यापेक्षा नवीन योजना आकर्षक वाटतात. उदा- म्युच्युअल फंड अधिक नफा कमावण्याच्या उद्देशाने बाजारात अनेक मार्ग आहेत, पैकी शेअर्समधील गुंतवणूक लाभदायी पण जोखीम सहन करण्याची क्षमता मात्र हवी. म्हणून म्युच्युअल फंड एक नामी साधन समजले जाते.आणि यात आपल्या व मुलांच्या गरजानुसार पैसे गुंतवता येतात. आणि नेमके त्याच हेतूसाठी वापरता येतात.

- Advertisement -

मुलांसाठी म्युच्युअल फंड योजनांचा विचार का करावा?

थेट शेअरबाजारात पैसे टाकण्याचा धोका नको असेल, तर म्युच्युअल फंड हा सेफ-नफादायी पर्याय मानला जात आहे.कसा आणि का ? ते पाहूया.
एक रकमी तसेच टप्याटप्याने पैसे गुंतवण्याची सुविधा
व्यावसायिक पद्धतीने गुंतवणूक
जोखीम विभागली जाते
अनेक फंडांचे पर्याय उपलब्ध
शिस्तबद्ध गुंतवणुकीची सवय लागते
वेगवेगळ्या कालावधीचे पर्याय
आपल्या बजेटनुसार, गरजेप्रमाणे ‘निवड’ करण्यास वाव
योग्य मार्गदर्शन

- Advertisement -

नेमकी निवड कशी करावी ? कोणते निकष असावेत?

  • तुमचे उत्पन्न – तुमचे खर्च -दोन्हीचा एकत्रित विचार केला पाहिजे. कारण स्थिर उत्पन्न किती आणि नियमित असणारे खर्च यांचा आढावा घेणे जरुरीचे आहे. दर महिन्याला किती पैसे तुम्ही बाजूला काढू शकता? हा आकडा कळला तर त्यानुसार आपल्या मुलामुलीसाठी म्युच्युअल फंड योजना निवडून एस.आय.पी. सुरू करता येईल.
  • मुलांच्या कोणत्या टप्प्यासाठी आपल्याला पैसे लागणार आहेत? त्यानुसार निवड करणे सोप्पे जाईल. शालेय खर्च, महाविद्यालयीन पातळी आणि पुढील व्यावसायिक अभ्यासक्रम-यापैकी अधिक खर्च असलेल्या शिक्षण-खर्चाची तरतूद करणे हे आपल्याला सहजशक्य आहे. दीर्घकालीन गुंतवणूक केली तर ती लाभदायक होऊ शकते.
  • वयाचे बंधन नाही- अगदी लहान वयात चालू करणे जास्त सोयीचे. कारण जितक्या लवकर तुम्ही तुमच्या बाळा-बेबीसाठी पैसे शिल्लक टाकायला लागला, तितकी अधिक रक्कम उभी राहू शकेल.
  • मुलीच्या उच्च शिक्षणासाठी, विदेशात जावून शिकण्यासाठी आणि लग्न अशा मोठ्या खर्चासाठी तुमच्या शिल्लकीद्वारे तुमची मोठी रक्कम उभी करू शकता.त्यात अशक्य काही नाही. कर्ज न काढता आपल्या कमाईचा भाग शिल्लक टाकून अशी किमया करू शकता.

कसे आणि कशात गुंतवाल?

अ अल्प -मुदतीसाठी – छान व्याज व रोकड-सुलभता

  • लिक्विड फंड हा सोयीस्कर आहे -अतिरिक्त पैसा आला की, यात टाकायचा आणि नंतर मोठी रक्कम दीर्घकालीन योजनेत गुंतवायची
  • डेब्ट आणि बॅलन्स फंड ऊशलीं इरश्ररपलश र्ऋीपव – साधारण 3 ते 5 वर्षांच्या मुदतीसाठी

ब दीर्घकालीन मुदतीसाठी -चांगले व्याज आणि वृद्धी

  • एस.आय.पी.- योजना सुरु करून किमान 10 ते 15 वर्षांसाठी प्रति महिन्याला आपल्याला पैसे गुंतवता येतील
  • इक्विटी म्युच्युअल फंड – 10 ते 15 वर्षे मुदतीसाठी

जोखीम पेलण्याची क्षमता पाहून आपण विविध योजनांमध्ये पैसे गुंतवू शकता म्हणजे एकत्रित न ठेवता विविध योजनांचा लाभ मिळू शकतो.

योग्य माहिती- योग्य निवड –

आपण कोणती योजना निवडावी? याचे मार्गदर्शन गुंतवणूक-सल्लागार-तज्ञ यांच्याकडूनच घ्यावे. ऐकीव किंवा काल्पनिक उदाहरणावरून कोणता असा निर्णय घेऊ नये.तुमची आजची कमाई,त्यात प्रतिवर्षी होणारी वाढ यांची अजून दहा-बारा वर्षांनी शिक्षणासाठी नेमकी किती फी होईल? अशी सांगड घातली गेली तर बचत आणि भविष्यकालीन गरज हे जुळतील आणि नेमका लाभ होऊ शकेल. केवळ शिक्षणच नव्हे तर मुलामुलींच्या जीवनातील लग्न -नवीन घर असे महत्वाचे टप्पे पार करण्यासाठी ‘आर्थिक पाठबळ’ देण्याचे काम होऊ शकते.

राजीव जोशी 

(अर्थ आणि बँकिंग अभ्यासक)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -