घरदेश-विदेशED : ईडीसमोर चौकशीस हजर होण्यास महुआ मोइत्रा यांचा नकार, कारण...

ED : ईडीसमोर चौकशीस हजर होण्यास महुआ मोइत्रा यांचा नकार, कारण…

Subscribe

नवी दिल्ली : फेमा अर्थात परकीय चलन कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी तृणमूल काँग्रेसच्या माजी खासदार महुआ मोइत्रा यांना सक्तवसुली संचालनालयाने (ED) समन्स बजावले आहे. मात्र तरीही, ईडीसमोर हजर राहण्यास त्यांनी नकार दिला आहे. आपण निवडणूक प्रचारात व्यस्त असल्याचे कारण त्यांनी दिले आहे.

हेही वाचा – Bacchu Kadu : दिव्यांग मंत्रालयाचा शब्द दिला नसता तर…, बच्चू कडूंनी यामुळे दिला शिंदेंना पाठिंबा

- Advertisement -

महुआ मोईत्रा आणि व्यावसायिक दर्शन हिरानंदानी यांना गुरुवारी ईडीने समन्स बजावले होते. फेमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी ईडीने या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मात्र महुआ मोइत्राने हजर राहण्यास नकार दिला असून आपण निवडणूक प्रचारात व्यस्त असल्याने आपल्याकडे फारसा वेळ नाही. तथापि, दर्शन हिरानंदानी यांची प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही.

- Advertisement -

महुआ मोईत्रा यांच्याबरोबर नॉन-रेसिडंट एक्सटर्नल अकाऊंटद्वारे व्यवहार करण्यात आला आहे. याशिवाय, परदेशातून निधी देखील ट्रान्सफर झाला आहे. हा पैसा कुठून आला आणि कोणत्या उद्देशाने ट्रान्सफर करण्यात आला, याची चौकशी महुआ मोईत्रा आणि दर्शन हिरानंदानी यांच्याकडे ईडीला करायची आहे. महुआ मोइत्रा यांची सीबीआयमार्फतही चौकशी सुरू आहे. कॅश फॉर क्वेरी (Cash for Query) प्रकरणात ही चौकशी करण्यात येत आहे.

हेही वाचा – Loksabha 2024: सांगलीसाठी देशाचं पंतप्रधानपद घालवणार का? राऊतांचा काँग्रेसला थेट सवाल

महुआ मोइत्रा यांनी रोख रकमेच्या बदल्यात प्रश्न विचारल्याचा आरोप भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी केला होता. या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर आरोप खरे असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर महुआ यांची खासदारकी रद्द करण्यात आली. महुआ मोईत्रा यांनी व्यावसायिक दर्शन हिरानंदानी यांना संसदेतील आपला लॉगिन आयडी दिला आणि पैशाच्या बदल्यात संसदेत प्रसिद्द उद्योगपती गौतम अदानी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात प्रश्न विचारल्याचा आरोप आहे. मात्र, तृणमूल काँग्रेस पक्षाने पुन्हा एकदा महुआ मोईत्रा यांना तिकीट दिले असून त्या कृष्णनगर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत.

हेही वाचा – NCP SP : …तर धाकदपट’शहां’ची भीती वाटत नाही, एनसीपी-एसपीचा अजित पवारांवर निशाणा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -