Maharashtra Assembly Election 2024
घरमहाराष्ट्रLoksabha 2024: सांगलीसाठी देशाचं पंतप्रधानपद घालवणार का? राऊतांचा काँग्रेसला थेट सवाल

Loksabha 2024: सांगलीसाठी देशाचं पंतप्रधानपद घालवणार का? राऊतांचा काँग्रेसला थेट सवाल

Subscribe

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फायदा होईल, असं कोणतही काम करू नका, असा अप्रत्यक्ष सल्ला ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसला दिला आहे. सोबतच त्यांनी वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा सुरू राहणार असल्याचीही माहिती दिली आहे. तसंच, सांगलीच्या जागेवरुन सुरू असलेल्या वादावरही त्यांनी भाष्य करत, काँग्रेसला थेट सवाल केला आहे. सांगलीच्या जागेसाठी देशाचं पंतप्रधानपद घालवणार का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. (Loksabha 2024 Will the Prime Minister of the country lose for Sangli Sanjay Raut s direct question to Congress )

शरद पवार, उद्धव ठाकरे, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, नाना पटोले यांच्या उपस्थितीत आज 4:30 वाजता बैठक होणार आहे. वंचित बहुजन आघाडीशी चर्चा सुरू आहे. त्यांनी जागा जाहीर केल्या आहेत तरीही चर्चा सुरू आहे. निवडणूक व्हायला वेळ आहे. आमची चर्चा निरंतर सुर आहे, असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं.

- Advertisement -

प्रकाश आंबेडकर आमच्या विचाराचे

राऊत म्हणाले की, देशात असलेली दळभद्री हुकूमशाही, शोषण, भ्रष्टाचार, संविधानाची हत्या हे होऊ नये म्हणून आम्ही लढा देत आहोत. बाळासाहेब आंबेडकरांशिवाय ही लढाई पूर्ण होऊ शकत नाही. संविधानाचं रक्षण हे आमची जबाबदारी नाही सर्वाधिक जबाबदारी बाळासाहेब आंबेडकर यांची आहे. भाजपाल प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मदत होईल,असं पाऊल प्रकाश आंबेडकर उचलणार नाहीत, असंही संजय राऊत यांनी स्पष्ट केलं.

आघाडी म्हटल्यावर असं होणारच..

काँग्रेस पक्षातल्या कुठल्या व्यक्तीने काही म्हटलं तर मी त्यावर बोलणार नाही. बाळासाहेब थोरात, नाना पटोले, मल्लिकार्जुन खर्गे यांनी काही म्हटलं तर मी त्यावर बोलेन. आमची चर्चा जवळपास संपूर्ण झाली होती. आमची यादी त्यानंतर आली आहे. रामटेक या ठिकाणी आमचा विद्यमान खासदार आहे, काँग्रेसने तिथे उमेदवार जाहीर केला. आम्ही तिथे आक्षेप घेतला का? सांगलीची जागा काँग्रेसला काही वाटलं असेल पण आम्हाला कोल्हापूर आणि रामटेकच्या जागेविषयी वाटलंच.

- Advertisement -

सगळ्यांना वाटतं की 48 जागा लढाव्यात. मग लढावं. आघाडी म्हटल्यावर जागांची बदलाबदल होतेच त्यात एवढं विशेष काही नाही. मला हे मान्य आहे की सांगली काँग्रेसचा गड आहे. पण कोल्हापूर, रामटेक या ठिकाणी आम्ही प्रबळ आहोत, त्या जागा दिल्या, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

(हेही वाचा: ED : ईडीसमोर चौकशीस हजर होण्यास महुआ मोइत्रा यांचा नकार, कारण…)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -