घरमहाराष्ट्रBacchu Kadu : दिव्यांग मंत्रालयाचा शब्द दिला नसता तर..., बच्चू कडूंनी यामुळे...

Bacchu Kadu : दिव्यांग मंत्रालयाचा शब्द दिला नसता तर…, बच्चू कडूंनी यामुळे दिला शिंदेंना पाठिंबा

Subscribe

अमरावती : भाजपाकडून खासदार नवनीत राणा यांना अमरावती लोकसभेतून उमेदवारी देण्यात आली आहे. ज्यामुळे आता महायुतीत मीठाचा खडा पडला. महायुतीतील घटक पक्ष असलेल्या प्रहार संघटनेकडून याचा कडाडून विरोध करण्यात येत आहे. आमदार बच्चू कडू यांनी तर यामुळे आता भाजपा आणि खासदार नवनीत राणा यांच्यावर जोरदार टीकास्त्र डागले आहे. बच्चू कडू यांनी एका वृत्त वाहिनीला मुलाखत देताना नवनीत राणा यांच्यावर निशाणा साधला. पण याचवेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर त्यांना त्यावेळी पाठिंबा का दिला? याचे कारण सांगितले आहे. (Bacchu Kadu said the reason for supporting Chief Minister Eknath Shinde)

हेही वाचा… Bacchu Kadu : ज्यांनी भाजपाचे कार्यालय फोडले, त्यांनाच उमेदवारी ही लाचारी, बच्चू कडूंचा भाजपाला टोला

- Advertisement -

यावेळी बोलताना आमदार बच्चू कडू यांनी सांगितले की, ज्या व्यक्तीला या निवडणुकीत पाडायचे आहे, त्या दृष्टीने सर्व प्रमुख नेत्यांनी एकत्र येऊन आपले लक्ष्य ठरवले पाहिजे. कोणत्या पक्षाचा कोणता उमेदवार निवडून येतो, हे महत्त्वाचे नाही. तर नवनीत राणा यांना पाडणे हे महत्त्वाचे आहे. तर, खोके घेतल्याशिवाय आम्ही पाठिंबा नाही, असे राणांकडून सांगण्यात आले. पण जर का असे असते तर आम्ही कधीच चित्र पालटले असते आणि यांच्यासारखा स्वतःचा पक्ष विकून भाजपाच्या दावणीला बांधला असता, असा टोला कडूंनी लगावला.

तसेच, प्रामाणिकपणे राहू आणि प्रामाणिकपणे काम करू. पण मी जे काही गुवाहाटीला गेलो होतो, ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिव्यांग मंत्रालयाचा शब्द दिला होता, म्हणून गेलो होतो. तो शब्द जर का मुख्यमंत्री शिंदेंनी दिला नसता तर मी गुवाहाटीत पाऊल देखील ठेवला नसता. आम्ही ज्या दिव्यांगांसाठी लढत होतो. आम्हाला आमचे लक्ष्य पूर्ण करायचे होते. गेल्या 15 ते 20 वर्षांपूर्वीचे आंदोलन यशस्वी करण्यासाठी आम्ही एकनाथ शिंदेंना पाठिंबा दिला आणि त्यामुळे दिव्यांग मंत्रालय मिळाले. जर का त्यांनी दिलेला शब्द पाळला नसता तर आम्ही युतीत नसतो. पण माझ्याच मतदारसंघात येऊन मला मी खोके घेतले असे बोलले जाते. ज्यामुळे मी खोके घेणारा नाही, तर दणके देणारा आमदार आहे, असे बच्चू कडू यांच्याकडून आज स्पष्ट करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -