घरमहाराष्ट्रNCP SP : ...तर धाकदपट'शहां'ची भीती वाटत नाही, एनसीपी-एसपीचा अजित पवारांवर निशाणा

NCP SP : …तर धाकदपट’शहां’ची भीती वाटत नाही, एनसीपी-एसपीचा अजित पवारांवर निशाणा

Subscribe

मुंबई : लोकसभा निवडणुकीचा ज्वर आता चढत चालला आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. त्यातूनच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने (एनसीपी – एसपी) एक व्हिडीओ शेअर करत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या समर्थक आमदार-खासदारांवर निशाणा साधला आहे.

हेही वाचा – Arvind Kejriwal: अरविंद केजरीवालांना दिल्ली उच्च न्यायालयाकडून दिलासा नाहीच; पुढील सुनावणी 3 एप्रिलला

- Advertisement -

शिवसेनेप्रमाणेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्यावर्षी जुलै महिन्यात मोठी फूट पडली आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली आमदारांचा मोठा गट सत्तेत सहभागी झाला. त्यानंतर अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हावरही दावा केला. केंद्रीय निवडणूक आयोगाने सुनावणी घेत त्यांना ते दोन्ही बहालही केले. पण यामुळे अजित पवार आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या एनसीपी – एसपीमध्ये मोठी दरी निर्माण झाली आहे. त्यामुळे संधी मिळेल तेव्हा दोन्ही गटांकडून एकमेकांवर शरसंधान केले जात आहे.

- Advertisement -

छत्रपती शिवाजी महाराजांची आज, गुरुवारी तिथीनुसार जयंती आहे. त्यानिमित्ताने एनसीपी – एसपीने एक व्हिडीओ शेअर केला आहे. मिर्झा राजा जयसिंग आणि राजा मानसिंग यांचा इतिहास कोणाला माहीत नाही, कारण ते मांडलिक होते. छत्रपती शिवाजी महाराज यांनाही औरंगजेबाने दख्खनची सुभेदारी देऊ केली. पण शिवाजी महाराजांनी औरंगजेबाचे मांडलिकत्व स्वीकारून त्याला मुजरा करण्यापेक्षा, आपल्या मातीसाठी आणि माणसांसाठी ताठ मानेने संघर्षाची वाट निवडली, असा हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओच्या अखेरीस ‘शिवचरित्र फक्त मिरवण्यापेक्षा अंगी जिरवलं तर, जुलमी सत्तेचे मांडलिकत्व स्वीकारावे लागत नाही, धाकदपट’शहां’ची भीती वाटत नाही.’ असे सांगत अजित पवार आणि त्यांच्या समर्थक आमदारांवर एनसीपी – एसपीने निशाणा साधला आहे.

हेही वाचा – Maha Politics : विजय शिवतारेंची मनधरणी करण्यात सरकारला यश? पुढील भूमिका आज होणार स्पष्ट

मांडलिक होऊन गुलामी की आपल्या मातीसाठी संघर्ष? आयुष्यात असे बरेच प्रसंग येतात जिथे तुमच्यात शिवचरित्र किती झिरपले याचा कस लागतो…. तेव्हा कच खाल्ली, मांडलिकत्व स्वीकारले, धाकदपटशाहीला बळी पडलात तर मात्र अशांना हा लढवय्या महाराष्ट्र माफ करत नाही, असेही शरद पवार यांच्या पक्षाने सुनावले आहे.

हेही वाचा – Bacchu Kadu : ज्यांनी भाजपाचे कार्यालय फोडले, त्यांनाच उमेदवारी ही लाचारी, बच्चू कडूंचा भाजपाला टोला

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -