घरदेश-विदेशलालूंचा पाय खोलात; मुले ईडीच्या रडारवर, चौघांच्या घरी ईडीचा छापा

लालूंचा पाय खोलात; मुले ईडीच्या रडारवर, चौघांच्या घरी ईडीचा छापा

Subscribe

लालू यांचा मुलगा तेजस्वी यादव तसेच हेमा, रागिनी आणि चंदा या तीन मुलींचा दिल्ली येथील घरी ईडीने छापे मारले आहेत. तसेच लालू यांच्या राष्ट्रीय जनता दलचे (आरजेडी) माजी आमदार अबू दोजाना यांच्या घरावरही ई़डीने छापा मारला आहे. दोजाना हे बांधकाम व्यावसायिक आहेत. दोजाना यांच्याकडे ज्ञात उप्तन्ना पेक्षा अधिक संपत्ती आहे.

 

नवी दिल्लीः नोकरीच्या बदल्यात जमीन या भ्रष्टाचार प्रकरणी माजी रेल्वे मंत्री लालू प्रसाद यांच्या तीन मुली व मुलाच्या घरी सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) शुक्रवारी छापा मारला. तसेच लालू यांच्या निकटवर्तीयांच्या घरीही ईडी पोहोचली आहे. दिल्ली, मुंबई, नोएडा आणि पाटणा अशा १५ ठिकाणी ईडीने छापे मारले आहेत.

- Advertisement -

लालू यांचा मुलगा तेजस्वी यादव तसेच हेमा, रागिनी आणि चंदा या तीन मुलींच्या दिल्ली येथील घरी ईडीने छापे मारले आहेत. तसेच लालू यांच्या राष्ट्रीय जनता दलचे (राजद) माजी आमदार अबू दोजाना यांच्या घरावरही ई़डीने छापा मारला आहे. दोजाना हे बांधकाम व्यावसायिक आहेत. दोजाना यांच्याकडे ज्ञात उप्तन्ना पेक्षा अधिक संपत्ती आहे. याच प्रकरणात ईडीने त्यांच्या घरावर छापा मारला आहे. ईडीने छापा मारल्यानंतर दोजाना हे घराच्या बाल्कनीत आले आणि म्हणाले, ही सर्व कारवाई राजकीय हेतूने प्रेरीत आहे. ईडीने दोजाना यांच्या कुटुंबियांना घरातून बाहेर न जाण्याची ताकिद दिली आहे. दोजाना यांच्या घरावर मारलेल्या छाप्याबाबत अधिक माहिती देण्यास ईडीच्या अधिकाऱ्यांनी नकार दिला.

लालू प्रसाद यांचे व्याही जितेंद्र यादव यांच्या गाजियाबाद येथील घरावरही ईडीने छापा मारला आहे. सकाळी ८ वाजताच ईडीचे सात ते आठ अधिकारी जितेंद्र यादव यांच्या घरी पोहोचले. त्यानंतर दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास ईडीचे अजून तीन अधिकारी जितेंद्र यादव यांच्या घरी दाखल झाले. घराचे दररवाजे बंद करुन ईडी कारवाई करत होती. जितेंद्र यादव हे समाजवादी पार्टीचे माजी आमदार आहेत. ते गाजियाबाद येथील आरडीसी राजनगर विभागात राहतात.

- Advertisement -

नोकरीच्या बदल्यात जमीन या भ्रष्टाचार प्रकरणी नुकतीच सीबीआयने लालू प्रसाद यादव यांची चौकशी केली. लालूंची मुलगी मीसा भारतीच्या घरी 3 तास चौकशी केल्यानंतर सीबीआय आधिकारी तेथून निघून गेले. सिंगापूरमधून किडनी प्रत्यारोपणानंतर लालू यादव सध्या मीसा भारती यांच्या दिल्लीतील निवासस्थानी राहत आहेत.  मुख्यमंत्री राबडी देवी यांचीही सीबीआयने त्यांच्या पाटणा येथील निवासस्थानी साडेचार तास चौकशी केली होती. राबडी देवी यांना 48 प्रश्न विचारण्यात आले. त्यानंतर ईडीने आज लालूंच्या कुटुंबियांच्या घरावर छापे टाकले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -