घरदेश-विदेशखाद्यतेलच तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढवणार - FSSAI

खाद्यतेलच तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढवणार – FSSAI

Subscribe

भारतीय अन्न संरक्षण आणि मानक प्राधिकरण म्हणजे एफएसएसआय हे खाद्यतेल निर्मात्या कंपन्यांना तेल निर्मिती दरम्यान व्हिटॅमिन अ आणि व्हिॅटमिन ड चा समावेश असलेले तेल तयार करायला लावण्याच्या विचारात आहे. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी मदत होईल असा विश्वास एफएसएसआयला वाटतो. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला अशा तेलाचा फायदा होतानाच, त्यांची रोगप्रतिकार शक्ती वाढण्यासाठीही त्याची मदत होईल असा विश्वास एफएसएसआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरूण सिंघल यांनी व्यक्त केला.

खाद्यतेल या विषयावर आयोजित वेबिनारमध्ये त्यांनी व्हिटॅमिनचा समावेश करण्याचा विचार मांडला आहे. महत्वाच म्हणजे विभिन्न सामाजिक स्थरांमध्ये जेव्हा खाद्यतेलाचा वापर केला जातो, अशावेळी नागरिकांच्या आहारात खाद्यतेलाच्या माध्यमातून व्हिटॅमिनचे सेवनही केले जाणे शक्य होईल असा त्यांचा विचार आहे. भारतात अनेक भागात अजुनही मोठ्या प्रमाणात कुपोषणाचे प्रमाण आढळते, तसेच जीवनसत्वांचा अभावही देशातील मोठ्या प्रमाणातील लोकसंख्येत दिसून येतो. त्यामध्ये मुख्यत्वेकरून व्हिटॅमिन ड आणि व्हिटॅमि अ यांचा समावेश आहे. व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे मृत्यूदराचे प्रमाण वाढण्यावर परिणाम होतो, उत्पादकतेवर परिणाम होतो तसेच आर्थिक विकासावरही याचा प्रभाव पडतो असे त्यांनी सांगितले. तुलनेत व्हिटॅमिन अ आणि व्हिटॅमिन ड मुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी मदत होते. सध्याच्या कोविड १९ च्या आव्हानात रोगप्रतिकारक शक्ती वाढणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

- Advertisement -

सद्यस्थितीला देशात ६९ टक्के खाद्यतेलाचा वापर होतो. त्यामध्ये ७० लाख ९४ हजार इतके खाद्यतेल भारतीय वापरतात. देशात अनेक ठिकाणी विक्री होणाऱ्या पॅकेजिंग ऑईलच्या माध्यमातून या तेलाचा वापर केला जातो. देशात राजस्थान येथे साधारणपणे १० वर्षे ते १९ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये व्हिटॅमिन अ कमी प्रमाणात आढळते आहे. राजस्थानसारख्या देशातील अनेक राज्यांमध्ये हा रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठीचा तेलाचा प्रयोग केला जाऊ शकतो.


 

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -