घरक्राइमCricket Betting : क्रिकेट बेटिंगमध्ये इंजिनिअरला दीड कोटींचा फटका; तगाद्याला कंटाळून पत्नीची...

Cricket Betting : क्रिकेट बेटिंगमध्ये इंजिनिअरला दीड कोटींचा फटका; तगाद्याला कंटाळून पत्नीची आत्महत्या

Subscribe

नवी दिल्ली : सध्या आयपीएल सुरू आहे. क्रिकेटप्रेमींचा त्याला जोरदार प्रतिसाद मिळतो आहे. अशाच काळात मोठ्या प्रमाणावर ऑनलाइन क्रिकेट सट्टा खेळला जातो. हा सट्टेबाजीचा नाद एका अभियंत्याला चांगलाच महागात पडला आहे. या नादापायी या अभियंत्याने तब्बल दीड कोटी रुपये गमावले असून त्याच्या पत्नीने आत्महत्या केली. पतीने ज्या लोकांकडून पैसे उसने घेतले होते. ते घरी येऊन त्रास देत असल्यामुळे हे पाऊल उचलत असल्याचे तिने सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे. या सुसाईड नोटच्या आधारे पोलिसांनी १३ जणांविरुद्ध कलम ३०६ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. १३ पैकी तीन जणांना अटकही करण्यात आली आहे.

कर्नाटकातील चित्रदुर्ग जिल्ह्यातील होसादुर्गाचे येथील ही घटना आहे. लघु पाटबंधारे विभागात कार्यरत असलेल्या दर्शन बाळू नावाच्या सहाय्यक अभियंत्याने झटपट पैसे कमावण्याच्या नादात क्रिकेट सट्टेबाजीत सुमारे दीड कोटी रुपये गमावले. ज्यांच्याकडून पैसे घेतले त्यांना तो हे पैसे परत करू शकला नाही. यासाठी त्याने सावकारांकडून कर्ज काढले. पैसे वसूल करण्यासाठी अनेक जण त्याच्या घरी तगादा लावू लागले. पैसे वसूल करण्यासाठी त्याच्या पत्नीला देखील त्रास देऊ लागले. या त्रासाला कंटाळून दर्शनची पत्नी रंजिता वी हिने आत्महत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २४ वर्षीय रंजिताने सुसाईड नोटमध्ये आरोप केला आहे की, तिच्या पतीने ज्या लोकांकडून कर्ज घेतले होते ते लोक अनेकदा त्यांच्या घरी येऊन त्रास देत असत. याला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे तिने लिहिले आहे. दर्शन आणि रंजिता या जोडप्याला दोन वर्षांचा मुलगाही आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Arunachal Pradesh : अरुणालच आमचेच… महिन्याभरात चौथ्यांदा दावा; चीनचे दावे बिनबुडाचे, भारताचे प्रत्युत्तर

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पैसे न दिल्यास संपूर्ण कुटुंबाची बदनामी करण्याची धमकी सावकारांनी दिली होती. यामुळे घाबरलेल्या रंजिताने १९ मार्च रोजी आत्महत्या केली. दर्शनने ज्यांच्याकडून कर्ज घेतले होते, अशा १३ जणांविरुद्ध मृत रंजिताच्या वडिलांनी गुन्हा दाखल केला आहे. तक्रारीच्या आधारे, १३ संशयितांविरुद्ध आयपीसी कलम ३०६ अंतर्गत आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १३ आरोपींपैकी शिवु, गिरीश आणि व्यंकटेश या तिघांना अटक करण्यात आली आहे, तर अन्य आरोपी अजूनही फरार आहेत.

- Advertisement -

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दर्शनने दीड कोटी रुपयांच्या कर्जापैकी बहुतांश पैसे कर्जदारांना परत केले होते. त्यापैकी ५४ लाख रुपये बाकी होते. विशेष म्हणजे, मुलगी गमावल्यानंतरही दर्शनच्या सासरच्यांनी आपल्या तक्रारीत त्याला निर्दोष ठरवले आहे. फिर्यादीनुसार, दर्शनला सट्टेबाजीमध्ये स्वारस्य नसून लोन शार्कने त्याला जाणीवपूर्वक आमिष दाखवून या जाळ्यात ढकलले.

हेही वाचा – Congress on PM Modi : …आणि मोदींनी काँग्रेसलाच भ्रष्टाचारमुक्त केलं; काय म्हणाले जयराम रमेश

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -