घरमहाराष्ट्रKolhapur Politics:...तर हातकणंगलेत उमेदवार देणार; जयंत पाटलांच्या वक्तव्याने मविआची स्ट्रॅटेजी समोर

Kolhapur Politics:…तर हातकणंगलेत उमेदवार देणार; जयंत पाटलांच्या वक्तव्याने मविआची स्ट्रॅटेजी समोर

Subscribe

कोल्हापूर: स्वाभीमानी पक्षाचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी हे मविआच्या पाठिंब्यावर लोकसभा निवडणूक लढवण्याची चर्चा सुरू होती. परंतु यादरम्यान आता एक सूचक वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलं आहे. जयंत पाटील म्हणाले, राजू शेट्टींना पाठिंबा देण्याचा आमचा प्रयत्न होता. मात्र आता त्यांचा वेगळाच पवित्रा असल्याचं दिसत आहे. त्यामुळे हातकणंगलेत दुसरा उमेदवार द्यावा लागणार असल्याचं सूचक विधान जयंत पाटील यांनी केलं आहे. (Kolhapur Politics then will give candidates in Hatkanangale Jayant Patil statement exposes MVA strategy)

माढ्यात दुसरा उमेदवार

माढ्याची जागा रासप नेते महादेव जानकर यांना देण्याचा निर्णय पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी घेतला होता. त्यांनी सहमती दर्शवली पण,ऐन वेळी ते महायुतीसोबत गेले. येथे दुसरा उमेदवार तयार असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.

- Advertisement -

भाजपच्या 45 प्लसची उडवली खिल्ली

यावेळी जयंत पाटील यांनी भाजपाच्या 45 प्लस नाऱ्याची खिल्ली उडवली. एक जागा तर कोल्हापूरमध्येच कमी होईल दुसरी साताऱ्यात होईल, असा दावा जयंत पाटील यांनी केला. कोल्हापुरात महाविकास आघाडीकडून शाहू महाराज तर साताऱ्यात अजून उमेदवार ठरलेला नाही.

सांगलीबाबत चर्चा सुरू

सांगतील शिवसेना उद्धव ठाकरे गटाने उमेदवार घोषित केला आहे. डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना सांगलीतून उतरवण्याचा निर्णय उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. मात्र त्याला काँग्रेसने तीव्र आक्षेप घेतला आहे. सांगलीची जागा काँग्रेसची असल्याचं काँग्रेसने अनेकदा बोलून दाखवलं आहे. मात्र या जागेवर उद्धव ठाकरेंनी उमेदवार उभा केल्याने, या जागेवर निर्माण झालेल्या तिढ्यावर आणखी काही मार्ग निघतो का? यावर चर्चा केली जाणार असल्याची माहितीही जयंत पाटील यांनी यावेळी दिली.

- Advertisement -

(हेही वाचा: Akola VidhanSabha : अकोला पश्चिम विधानसभेची पोटनिवडणूक रद्द, नागपूर खंडपीठाचे आदेश)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -