घरताज्या घडामोडीPF Balance सांगणारा नंबर झाला Out Of Order, आता 'हा' आहे नवीन...

PF Balance सांगणारा नंबर झाला Out Of Order, आता ‘हा’ आहे नवीन नंबर

Subscribe

EPFO च्या ट्विटर अकाउंटवरुन अकउंट बॅलन्स आणि स्टेटमेंट चेक करण्यासाठीचा नंबर बदलण्यात आल्याची माहिती देण्यात आली

EPFO च्या ६ करोडहून अधिक युझर्स घरी बसून अकाउंट बॅलन्स आणि स्टेटमेंट चेक करताना अडखळा येत आहे. अकाउंट बॅलेन्स चेक करण्यासाठी देण्यात आलेला 011-29401406 हा नंबर काम करत नाहीये. या नंबर वर Out of order असा मेसेज येत आहे. या नंबर अचानक बंद झाल्याने PF चेक करणाऱ्या युझर्सना मोठा अडथळा येत आहे. EPFO च्या स्थानिक कार्यालयात फोन केल्यास तिथूनही कोणतेही उत्तर मिळत नाही. EPFO च्या ट्विटर अकाउंटवरुन अकउंट बॅलन्स आणि स्टेटमेंट चेक करण्यासाठीचा नंबर बदलण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. आता नवीन नंबरवरुन आपले PF बॅलेन्स कसे चेक करायचे जाणून घ्या. (EPF account Balance and statement check number is out of order, check new number)

- Advertisement -

EPFO ने अकाउंट बॅलेन्स चेक करण्यासाठी त्याचप्रमाणे इतर कोणत्याही कामांसाठी कोणती ऑनलाईन पद्धत वापरायची याची माहिती दिली आहे. PF बॅलेन्स जाणून घेण्यासाठी आता ०११-२२९०१४०६ या क्रमांकावर missed call द्यावा लागणार आहे. missed call केल्यानंतर तुमच्या रजिस्टर मोबाईल क्रमांकावर मेसेजच्या माध्यमातून तुम्हाला हवी असलेली सर्व माहिती तुम्हाला मिळेल. यात तुमचा EPF अकाउंट नंबर, नाव,जन्म तारिख, बॅलन्स असलेले पैसे या सर्वांची माहिती देण्यात येईल.

अकाउंट बॅलेन्स चेक करण्यासाठी त्यांनी आणखी एक पर्याय दिला आहे. तो म्हणजे Umang App. उमंग अँपच्या माध्यमातून EPFO संबंधी अधिक माहिती मिळवता येईल. उमंग अँप डाउनलोड केल्यानंतर त्यात UAN नंबर द्यावा लागेल त्यानंतर OTP येऊन व्हेरिफिकेशन केले जाईल आणि त्यानंतर तुमच्या PF अकाउंटचे सर्व डिटेल्स तुम्हाला पाहता येतील.

- Advertisement -

हेही वाचा – DYSP पदावरील मुलाने ASI आईला केला कडक सॅल्यूट! आई-लेकाचा फोटो व्हायरल

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -