EPFO : आता पेन्शनबाबत नो टेन्शन, EPFOकडून नवीन उपक्रम जारी, जाणून घ्या

पेन्शन धारकांना भेडसावणाऱ्या समस्या कमी करण्यासाठी EPFOकडून एक नवीन उपक्रम जारी करण्यात आला आहे. आझादीच्या अमृत महोत्सवांतर्गत घेतलेल्या पुढाकारअंतर्गत ईपीएफओकडून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना काही नवीन सुविधा दिल्या जात आहेत. ईपीएफओने केवळ जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची अंतिम मुदतच काढली नाही, तर आता कर्मचाऱ्यांना त्यांच्या निवृत्तीच्या दिवशी पेन्शन पेमेन्ट ऑर्डर देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

ईपीएफओने ट्विट करत म्हटले आहे की, ईपीएफओद्वारे सदस्य निवृत्तीच्या दिवशी पेन्शन पेन्मेंट ऑर्डर मिळवू शकतील. सर्व प्रादेशिक कार्यालये सेवानिवृत्तीच्या दिवशी पीपीओ जारी करण्याचा प्रयत्न वेबिनार आयोजित करत आहे. तीन महिन्यांच्या आत निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना नियोक्त्यांसोबत वेबिनारमध्ये मार्गदर्शन आणि प्रशिक्षणासाठी आमंत्रित केले जात आहे. या उपक्रमाचा लाभ दरवर्षी निवृत्त होणाऱ्या समारे ३ लाख कर्मचाऱ्यांना होणार आहे.

आता पेन्शनधारक संपूर्ण वर्षात कधीही जीवन प्रमाणपत्र सादर करू शकतात. जे पुढील एक वर्षांसाठी वैध ठरणार आहे. निवृत्ती वेतन धारकांना दरवर्षी जीवन प्रमाणपत्र सादर करावे लागते. ईपीएफओ यांच्या मते, ईपीएस ९५ चे निवृत्तीवेतन धारक कोणत्याही मुदतीशिवाय वर्षातून कधीही त्यांचे जीवन प्रमाणपत्र सादर करू शकतात. हे प्रमाणपत्र सादर केल्याच्या तारखेपासून पुढील एक वर्षांसाठी वैध ठरणार आहे.


हेही वाचा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेणार कोकणातील आमदारांसोबत महत्त्वाची बैठक, काँग्रेसविरोधात तक्रार करण्याची शक्यता