घरदेश-विदेशरिटर्न फाईल भरण्यास 10 जानेवारीपर्यंत मुदतवाढ

रिटर्न फाईल भरण्यास 10 जानेवारीपर्यंत मुदतवाढ

Subscribe

आर्थिक वर्ष 2019-20 च्या इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. 31 डिसेंबर असलेली अंतिम मुदत 10 जानेवारीपर्यंत वाढवण्यात आली असल्याची माहिती वित्त मंत्रालयाने बुधवारी सायंकाळी दिली.

28 डिसेंबरपर्यंत तब्बल 4.37 कोटी लोकांनी रिटर्न फाईल केल्या आहेत. ज्यांच्या बँक खात्याचे ऑडिट करण्याची आवश्यकता नसलेल्या वैयक्तिकरित्या रिटर्न फाईल्स भरणार्‍यांना या संधीचा लाभ होणार आहे. टॅक्स भरण्यासाठी नागरिकांनी आयटीआर 1 आणि आयटीआर 4 चा उपयोग करता येणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 31 जुलैला आयटीआर भरण्याची मुदत संपल्यानंतर प्रथम 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ दिली. त्यानंतर ही तारीख 31 डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली होती.

- Advertisement -

ज्या नागरिकांच्या खात्याचे ऑडिट होते आणि जे टॅक्स भरतात आणि ज्यांना इंटरनॅशनल फायनान्शियल ट्रांजेक्शनचा अहवाल देणे गरजेचे आहे, अशा नागरिकांना 15 फेब्रुवारीपर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे. तसेच टॅक्स ऑडिट रिपोर्ट सादर करण्याची तारीख 15 जानेवारीपर्यंत वाढवण्यात आली आहे. निर्धारित वेळेत आयटीआर न भरल्यास 10 हजार रुपयांचा दड आणि तुरुंगवास होण्याची शक्यता आहे.

फास्टॅगची मुदतीतही २६ जानेवारीपर्यंत वाढ
नवीन वर्षापासून म्हणजे 1 जानेवारीपासून टोल नाक्यांवर वाहनांसाठी फास्टॅग (FASTag) अनिवार्य करण्यात येणार आहे. मात्र, राज्य सरकारच्या अखत्यारित येणार्‍या रस्त्यांसाठी हा नियम 26 जानेवारीपासून लागू होणार आहे. मात्र केंद्र सरकारच्या ताब्यातील रस्त्यांना मात्र 1 जानेवारी 2021 फास्टॅग अनिवार्य असणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -