घरदेश-विदेशFact Check:आधार कार्डवर मिळू शकते 1 टक्के व्याजदराने कर्ज? सविस्तर जाणून घ्या...

Fact Check:आधार कार्डवर मिळू शकते 1 टक्के व्याजदराने कर्ज? सविस्तर जाणून घ्या पंतप्रधान योजनेबद्दल

Subscribe

1 टक्के व्याजाने पंतप्रधान योजनेअंतर्गत आधार कार्डद्वारे तुम्हाला कर्ज मिळू शकते तसेच 50 टक्के सूट अशी ऑफर देण्यात आली आहे.

देशात आजकाल ऑनलाईन फसवणूक होण्याचे प्रमाण फार वाढले आहे. लोकांची व्यक्तीगत माहिती बँक डिटेल्स काढून त्यांना गंडवण्यात येते. आता नुकतच मोबाईलवर सरकार फक्त 1 टक्के व्याज दराने कर्ज देत आहे असा मेसेज व्हायरल होतोय. या मेसेजला भूलून अनेक लोकं या ऑनलाईन फ्रॉडला बळी पडतात. तर अनेकजण हा मेसेज वाचून अवाक् झाले कारण या देशात सामान्य जनतेसाठी सर्वात स्वस्त लोन हे होम लोन आहे. या लोनअंतर्गत वार्षिक 7 टक्के व्याजदर भरावा लागतो. तसेच कृषीसंबधीत कर्जावर 4 टक्के व्याजदर आखण्यात येतो.जर तुम्हाला कोणी सांगितले,सरकार फक्त 1 टक्के व्याज दराने लोन देत आहे. तर अनेक जण हे लोन घेण्याचा प्रयत्न नक्कीच करतील. पण हा मेसेज निव्वळ एक फेक मेसेज असल्याचे केंद्र सरकारच्या PIB Fact Check ने स्पष्ट केलं आहे.

- Advertisement -

सध्या व्हॉट्सॲपवर 1 टक्के व्याजाने पंतप्रधान योजनेअंतर्गत आधार कार्डद्वारे तुम्हाला कर्ज मिळू शकते तसेच 50 टक्के सूट अशी ऑफर देण्यात आली आहे. हा मॅसेज सध्या सगळीकडे व्हायरल होत आहे. यामुळे अनेकांची दिशाभूल होत आहे. यानंतर सरकारने हा मेसेज बोगस असून केंद्र सराकारची अशी कोणत्याही प्रकारची योजना नसल्याचे स्पष्ट केलं आहे. तसेच एवढ्या कमी व्याजदराने आम्ही कोणलाही कर्ज देत नाही. असे पीयाबीने म्हंटले आहे.


हे हि वाचा – Nasal Spray Covid Vaccine: कॅनडाची सॅनोटाइज कंपनी भारतासह १२ देशांना करणार ‘नेझल स्प्रे’ लसींचा पुरवठा

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -