घरCORONA UPDATELockDown: बोगस आयएएस अधिकाऱ्यांची पोलखोल; पोलिसांनी केली अटक

LockDown: बोगस आयएएस अधिकाऱ्यांची पोलखोल; पोलिसांनी केली अटक

Subscribe

राजधानी दिल्लीतील उत्तर-पश्चिमी भागात असणाऱ्या केशव पुरम परिसरात पोलिसांनी एका बोगस आयएएस अधिकाऱ्याला अटक केली आहे.

राजधानी दिल्लीतील उत्तर-पश्चिमी भागात असणाऱ्या केशव पुरम परिसरात पोलिसांनी एका बोगस आयएएस अधिकाऱ्याला अटक केली आहे. आयएएस असल्याची बतावणी करत लॉकडाऊनच्या काळात रस्त्यावर बिनधोकपणे फिरणाऱ्या या इसमाला पोलिसांनी चेकिंगच्यावेळी अडवले आणि त्याची चौकशी केली. पोलिसांच्या चौकशीतही हा इसम अरेरावीची भाषा करू लागला. आयएएस अधिकारी असल्याचे सांगत पोलिसांनाच दम देऊ लागला. अखेर पोलिसांनी त्याची पोलखोल करत त्याला अटक केली.

काय आहे प्रकरण 

चारकाचीतून फिरणारा हा इसम स्वतः २००९ चा आयएएस अधिकारी असल्याचे पोलिसांना सांगू लागला. पिकेट चेकिंगवर उपस्थित असलेल्या पोलिसांनी त्या इसमाकडे ओळखपत्र मागितले आणि आरोपीचे पितळ उघडे पडले. आदित्य गुप्ता या २९ वर्षीय आरोपीचे नाव असून केशव पुरम पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पोलिसांनी आरोपीची गाडीही जप्त केली आहे.

- Advertisement -

उत्तर-पश्चिम जिल्ह्याचे पोलीस उपायुक्त विजयंता आर्य यांनी माहिती दिली की, लॉकडाऊनच्या काळात नियम मोडले जाऊ नये म्हणून दिल्लीत जागोजागी चेकिंग पॉईंट्स ठेवण्यात आले आहेत. त्या माध्यमातून पोलिसांची तपासणी सुरू आहे. दरम्यान, शुक्रवारी रात्री साडेदहा वाजता केशव पुरम पोलीस ठाणे हद्दीत चेकिंग पॉईंटवर पोलिसांनी एका गाडीला थांबण्याचा इशारा केला. पंरतू गाडीतील इसमाने पोलिसांवरच अरेरावी केली. त्याने स्वतःला वरिष्ठ आयएएस अधिकारी असल्याचे सांगितले. त्याच्या गाडीवर भारत सरकार आणि दिल्ली पोलीसचे स्टीकर लावण्यात आले होते. गाडीच्या पुढील भागात देशाचा झेंडादेखील लावला होता. हे पोलीस थोडावेळ बिचकले, मात्र नंतर त्यांनी या इसमाकडे ओळखपत्र मागितले. ओळखपत्र नसल्याने पोलिसांना त्याच्यावर संशय आला आणि त्याला अटक केली.

हेही वाचा –

टिकटॉक स्टारने उडवली मास्कची खिल्ली, आता त्यालाच कोरोनाची लागण

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -