करोनामुळे नाही तर मद्यसेवनामुळेच इराणमध्ये सर्वाधिक मृत्यू

चीन नंतर इराणमध्ये करोना व्हायरसने सर्वाधिक बळी घेतले आहेत. आतापर्यंत इराणमध्ये २२०० जणांचा मृत्यू झाला आहे. पण तुम्हांला हे ऐकूण धक्का बसेल की हे सगळेच मृत्यू करोनामुळे नाही तर करोनाचा प्रकोप टाळण्यासाठी केलेल्या अतिमद्यसेवनाने झाले आहेत. यामुळे येथील आरोग्य विभागाने नागरिकांना मद्यापासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. येथील स्थानिक प्रसारमाध्यमांनी हा खुलासा केला आहे.

इराण इस्लामिक राष्ट्र असून कट्टरपंथीय आहे. प्रत्येक गोष्ट धर्माशी जोडून बघत असल्याने येथे अंधश्रद्धेचे बीज कालाधीत रुजलेले आहे. यामुळे येथे जेव्हा करोना धडकला तेव्हा त्याचाही संबंध हा प्रकोप असल्.ाची अफवा पसरू लागली. त्याचबरोबर मद्यसेवन केल्यास हा प्रकोप टळेल असा संदेशही येथील सोशल मीडीयावर व्हायरल झाला. इस्लाममध्ये मद्यसेवनास परवानगी नाही. यामुळे येथे मद्यविक्रीवरही बंदी आहे. पण या अफवेनंतर तस्करीच्या मार्गाने येथे मोठ्या प्रमाणावर मद्याचा साठा उपलब्ध झाला. त्यामुळे धर्मिक बंधन झुगारुन नागरिकांनी जीव वाचवण्यासाठी मद्य पिण्यास सु रुवात केली. ज्यांना मद्य मिळाले नाही अशा लोकांनी मेथॅनाल पिण्यास सुरुवात केल्याचे जाहीर करून तेहरान येथील प्रसारमाध्यमांनी सगळीकडे खळबळ उडवून टाकली आहे. लहान मुलांना करोनापासून दूर ठेवण्यासाठी अनेकांनी मेथॅनॉल पाजले. त्यात काही मुलांची दृष्टीही गेली. तर ३०० जणांचा मृत्यू झाला. तर १०००हून अधिक जण अतिमद्यसेवनाने आजारी पडले आहेत.

येथील ओस्लो मधील क्लिनिकल टॉक्सिकॉलोजिस्ट डॉक्टर नट एरिक होवदा यांनी करोना इराणमध्ये झपाट्याने पसरत असून नागरिकांच्या मृत्यूचा आकडा वाढत असल्याचे सांगितले आहे. त्याचबरोबर जर नागरिक अशाच प्रकारे मद्यसेवन करत राहतील तर देशावर करोनाहूनही मोठ संकट कोसळेल असा इशारा दिला आहे.

दरम्यान इराणमध्ये मद्यविक्रीस परवानगी नसल्याने काहीजण अल्कोहोलमध्ये ब्लीच मिसळवत आहेत. जेणेकरुन अल्कोहोलचा प्रभाव कमी होतो. या प्रकियेतून मॅथेनाल तयार होते. यामुळे करोना पासून बचाव करण्यासठी मॅथेनाल विकत घेण्याकडे इराणी लोकांचा कल आहे. मँथेनॉल शरीरास अपायकारक असून याच्या सेवनामुळे पाचकसंस्थेस अपाय होऊन करोना रुग्णांबरोबरच सामान्य नागरिक मृत्यूमुखी पडत आहेत.