घरCORONA UPDATEसंतापजनक! घरात लहान मुलं, वयोवृध्द असतानाही पालिकेने ठोकले पत्रे

संतापजनक! घरात लहान मुलं, वयोवृध्द असतानाही पालिकेने ठोकले पत्रे

Subscribe

अखेर महापालिका आयुक्तांना याप्रकरणी माफी मागावी लागली.

बंगळूरमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. घरात कोरोना रूग्ण सापडल्याने घरं सील करताना महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी घराबाहेर पत्रे ठोकून कुटुंबांनाच घरात कोंडल्याचा धक्कादायक प्रकार बंगळुरूत घडला आहे. या घ़टनेनंतर नागरिकांनी संताप व्यक्त केला असता. अखेर महापालिका आयुक्तांना याप्रकरणी माफी मागावी लागली.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, महापालिका कर्मचाऱ्यांनी दोन फ्लॅटचे दरवाजे सील केले होते. या घरांमध्ये एक महिला, दोन लहान मुलं आणि वृद्ध नागरिक वास्तव्यास होते. या घटनेवर संताप व्यक्त होऊ लागल्यावर अखेर महापालिका आयुक्त एन मंजुनाथ प्रसाद यांनी तात्काळ पत्रे हटवण्याचे आदेश दिले आहेत. एन मंजुनाथ प्रसाद यांनी ट्विट करत म्हटले आहे की, “बॅरिकेड्स लगेच हटवले जातील याची मी काळजी घेतली आहे. सर्वांना आदराने वागणूक देण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. संसर्ग झालेल्यांचं संरक्षण करणं आणि न झालेल्यांना सुरक्षा देणं हा कंटेनमेंटचा हेतू आहे”.

बंगळुरुमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. जाहीर करण्यात आलेला लॉकडाउन गुरुवारी संपला आहे. दरम्यान मुख्यमंत्री येदियुरप्पा यांनी यापुढे कंटेनमेंट झोन वगळता दुसरीकडे लॉकडाउन जाहीर केला जाणार नाही असं सांगितलं आहे. गुरुवारी कर्नाटकात ५००० कोरोनाबाधित रुग्ण आढळले तर ९७ मृत्यू झाले.

- Advertisement -

हे ही वाचा – या महिन्यात लागणार दहावीचा निकाल, शिक्षणमंत्र्यांनी दिली माहिती!


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -