घरताज्या घडामोडीदिल्लीतील पटपडगंजमध्ये आग लागली; एकाचा मृत्यू

दिल्लीतील पटपडगंजमध्ये आग लागली; एकाचा मृत्यू

Subscribe

अग्निशामक दलाच्या ३२ गाड्या आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत. या आगीत एकाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.

नवी दिल्लीतील पटपडगंज औद्योगिक क्षेत्रातील आस्थापनेत आग लागल्याची दुर्घटना घडली आहे. आज पहाटेच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अग्निशामक दलाच्या ३२ गाड्या आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत. या आगीत एकाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.

- Advertisement -

नवी दिल्लीतील पटपडगंज औद्योगिक क्षेत्रातील आस्थापनेत आग लागल्याची घटना घडली आहे. घटनेची माहिती कळताच स्थानिक पोलीस आणि अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. आगीचे स्वरुप मध्यम प्रमाणाचे असून अग्निशामक दलाचे जवान आगीवर नियंत्रण मिळवण्याचे आटोकाट प्रयत्न करत आहेत. तसेच या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाल्याची माहिती अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्याने दिली आहे. तर आग कोणत्या कारणाने लागली हे अद्याप अस्पष्ट असल्याचे दिल्ली पोलिसांनी सांगितले आहे.

आगीच्या दुर्घटनांमध्ये वाढ

दरम्यान मागील काही दिवसांमध्ये दिल्लीत आग लागण्याच्या दुर्घटनांमध्ये वाढ झाली आहे. दिल्लीच्या धान्यबाजार क्षेत्रात आग लागली होती. त्यावेळी ४३ कामगार ठार झाले होते. त्यानंतर किराडी कारखान्यातसुद्धा आगीची दुर्घटना घडली होती. यामध्ये ९ जणांचा मृत्यू झाला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -