घरदेश-विदेशदिल्ली : विकास भवनला पुन्हा भीषण आग

दिल्ली : विकास भवनला पुन्हा भीषण आग

Subscribe

दिल्ली येथील विकास भवनमध्ये पुन्हा एकदा आगीची घटना घडली आहे. या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम अग्निशमन दल करत आहे.

दिल्ली येथील विकास भवनला भीषण आग लागली आहे. विकास भवनच्या दुसऱ्या मजल्यावरील महिला आयोगाच्या कार्यालयात ही आग लागली असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. दरम्यान, या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीत अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहे. यासोबतच आग विजवण्याचे कामही अग्निशमन दलाचे जवान युद्ध पातळीवर करत आहेत. ११ मार्च २०१९ रोजी देखील विकास भवनच्या सहाव्या मजल्यावर भीषण आग लागली होती. मात्र, तरीही हे आगीची सत्र अजूनही सुरुच आहे. मार्च महिन्यातील आगीच्या आठवणी धगधगत्या असतानाच तीन महिन्यांनी पुन्हा एकदा विकास भवनला आग लागली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -