घरदेश-विदेशहैदराबादमध्ये पाच दिवस सापाने केला मेट्रोने प्रवास!

हैदराबादमध्ये पाच दिवस सापाने केला मेट्रोने प्रवास!

Subscribe

मेट्रो रेल प्राधिकरणाच्या नाकी नऊ आणणाऱ्या या सापाची सर्पमित्रांनी अखेर केली सुटका

हैदराबादमध्ये दोन फुट लांबीच्या असणाऱ्या सापाने पाच दिवस मेट्रोने प्रवास केल्याची घटना समोर आली आहे. हा साप मेट्रो चालकाच्या केबिनमधून पकडण्यात आला. या सापाने मेट्रो रेल प्राधिकरणाच्या आणि सर्पमित्रांच्याही नाकी नऊ आणले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ब्राँझबॅक ट्री या जातीचा असून हा साप बिनविषारी साप असल्याचे सांगितले जात आहे. हैदराबादमधील चालत्या मेट्रो ट्रेनमध्ये चालकाच्या केबिनमध्ये १४ ऑगस्टला पहिल्यांदा दिसला होता. साप दिसताच ट्रेन थांबवून सर्पमित्रांना बोलावण्यात आले. मात्र साप तेथून पसार झाला होता. या नंतर काही दिवस सर्पमित्र या मेट्रोमध्ये लपून बसलेल्या सापाला शोधण्याचा प्रयत्न करतच होते. यावेळी तो कोणाच्याही निदर्शनास न आल्याने मेट्रोच्या इंजिनच्या यंत्रामध्ये लपून बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती.

- Advertisement -

असा घडला प्रकार

हा पसार झालेला साप काल सोमवारी मेट्रोचालकाच्या केबिनमध्ये आढळला. मेट्रो रेल प्राधिकरणाच्या आणि सर्पमित्रांच्याही नाकी नऊ आणणाऱ्या या सापाची सर्पमित्रांनी सुटका केली. अथक प्रयत्नांनंतर अखेर पाच दिवसांनी मेट्रोत शिरलेला साप चालकाच्या केबिनमधून पकडला. वनविभागाच्या आणि सर्पमित्रांच्या मदतीने या सापाला जंगलात सोडून देण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -