Friday, April 9, 2021
27 C
Mumbai
घर देश-विदेश गडचिरोली खोब्रामेंढा जंगलात पोलीस- नक्षलवाद्यांमध्ये चकमक, ५ नक्षलवादी ठार

गडचिरोली खोब्रामेंढा जंगलात पोलीस- नक्षलवाद्यांमध्ये चकमक, ५ नक्षलवादी ठार

Related Story

- Advertisement -

कुरखेडा पोलीस उपविभागांतर्गत येणाऱ्या पोलीस मालेवाडा परिसरातीसल खोब्रामेंढा जंगलात पोलिसांनी ५ नक्षलवाद्यांना ठार केले आहे. सोमवारी सकाळी ७.३० च्या सुमारास पोलिसांचे नक्षलवादीविरोधी अभिनाय सुरु होते. यावेळी पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत ५ नक्षलवादी मारले गेले. यावेळी पोलिसांनी नक्षलवाद्यांचे कॅम्प उध्वस्त करत घातपाताचा कट उधळून लावला आहे. तसेच अनेक घातक साहित्य जप्त केले आहे.

मारल्या गेलेल्या नक्षलवाद्यांमध्ये ३ पुरुष आणि २ महिला नक्षलवाद्यांचा समावेश होते. गेल्या शनिवारपासून पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरु आहे. आतापर्यंत दोन चकमकी झाल्या आहे.खोब्रामेंढा जंगलात नक्षलवादी मोठ्या प्रमाणात एकत्र आले असून, ते दरवर्षी नक्षल्यांकडून पाळल्या जात असलेल्या टिसीओसी नक्षल सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर घातपात घडवून आणणार असल्याची गोपनीय माहिती पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांना मिळाली.

- Advertisement -

यातच अपर पोलीस अधीक्षक (अभियान) मनीष कलवानीया यांच्या नेतृत्वाखाली खोब्रामेंढा, हेटाळकसा जंगल परिसरात गडचिरोली पोलीस दलातील सी-६० चे जवान नक्षलविरोधी अभियान राबवित आहेत. याचदरम्यान शनिवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास हिटाळकसा जंगलात तीन वेगवेगळ्या ठिकाणी ६० ते ७० नक्षलवादी सी-६० जवानांना ठार मारण्याच्या उद्देशाने दबा धरून बसले होते. यावेळी नक्षलवाद्यांनी जवानांनवर जोरदार गोळीबार करण्यास सुरुवात केली. यावेळी जवानांनीही प्रत्युत्तरादाखल नक्षलवाद्यांच्या दिशेने गोळीबार केला. जवळपास १ ते दीड तास पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरु होती. याचवेळी पाच नक्षलवादी ठार झाले. पोलिसांचा वाढता दबाव पाहून काही नक्षलवाद्यांनी घनदाट जंगलाचा फायदा घेत घटनास्थळावरून पोबारा केला. या चकमकीनंतर घटनास्थळावरून पोलिसांनी मोठ्या प्रमाणात नक्षलवाद्यांचे साहित्य जप्त करण्यात आले.


 

- Advertisement -