घरदेश-विदेशअरुण जेटली यांची प्रकृती चिंताजनक

अरुण जेटली यांची प्रकृती चिंताजनक

Subscribe

गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतील एम्स हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेले माजी अर्थमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांची प्रकृती अजूनच खालावली असल्याची माहिती समोर येत आहे.

गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतील एम्स हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेले माजी अर्थमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांची प्रकृती अजूनच खालावली असल्याची माहिती समोर येत आहे. एएनआयने एम्समधील सुत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार अरुण जेटली यांच्यावर कार्डिओ-न्यूरो सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. सध्या त्यांना एक्स्ट्राकोर्पोरियल मेंब्रेन ऑक्सिजनेशन (ECMO) आणि इंट्रा-एओर्टिक बलून पंप (IABP) सपोर्ट द्यावा लागत आहे. याआधी त्यांना लाईफ सपोर्ट सिस्टीमवर ठेवण्यात आले होते.

- Advertisement -

श्वसनाचा त्रास जाणवू लागल्यानं नऊ ऑगस्ट रोजी अरुण जेटली यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह गृहमंत्री अमित शहा, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन दीक्षित यांनी त्यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली आहे.

हे वाचा – धुळ्यात कंटेनर-एसटी बसचा अपघात; चालकासह १० ठार, २० जखमी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -