घरदेश-विदेशअमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश यांचे निधन

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश यांचे निधन

Subscribe

अमेरिकेचे ४१ वे राष्ट्राध्यक्ष आणि ४३ वे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू. बुश यांचे वडिल एच. डब्ल्यू. बुश यांचे निधन यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनाची माहिती कुटुंबीयांकडून देण्यात आली आहे.

अेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज. एच. डब्ल्यू. बुश यांचे दीर्घ आजाराने निधन झाले आहे. ते ९४ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली आहे. त्यांच्या निधनानंतर अमेरिकेतील राजकारणात शोककळा पसरली आहे. जॉर्ज एच. जब्ल्यू हे अमेरिकाचे ४१ वे राष्ट्राध्यक्ष होते. याच बरोबर अमेरिकेचे ४३ वे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू. बुश यांचे वडिल आहेत. त्यांच्या निधनानंतर अनेक राजकीय नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे.

- Advertisement -

राजकीय कारकीर्द

बुश यांची राजकीय कारकीर्द मोठी आहे. आपल्या जीवनातील अनेक वर्ष ते राजकारणात सक्रिय होते. राष्ट्राध्यक्ष बनवण्यापूर्वी ते संयुक्त राष्ट्र आणि चीन येथे अमेरिकेचे राजदूत म्हणून कार्यरत होते. सेंट्रल इंटेलिजेंस एजन्सी (सीआयए) चे निर्देशक म्हणूनही त्यांनी काम केले. बुश यांच्याच कार्यकाळात पहिले खाडी युद्ध झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -